अभिनेत्री पूजा भट्ट दारूचं व्यसन सोडल्याने चर्चेत

अभिनेत्री पूजा भट्ट आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे नेहमीच चर्चेत असते. 

Updated: Dec 24, 2020, 11:12 PM IST
अभिनेत्री पूजा भट्ट दारूचं व्यसन सोडल्याने चर्चेत

मुंबई : अभिनेत्री पूजा भट्ट आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. मात्र यावेळी ती चक्क आपलं दारुचं व्यसन सोडल्यामुळे चर्चेत आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पाहुया काय म्हणाली पूजा भट्ट -

“होय, आयुष्य बदलवून टाकणाऱ्या त्या निर्णयाला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. यापूर्वी गुलाबी शॅम्पेन, माल्ट आणि शहरातील गर्दी होती. आज शहरापासून दूर एकांतात आयुष्याचा आनंद घेतेय. हा मला समृद्ध करणारा प्रवास होता.” अशा आशयाचं ट्विट करुन आपण मद्यपान सोडल्याचं अभिनेत्री पूजा भट्टनं सांगितलं. तिनं हे ट्विट करताच, अनेकांनी तिच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.