'मै खिलाडी तू अनाडी', 'जोश' या चित्रपटांच्या निर्मात्याचं निधन

व्हीनस रेकॉर्ड्स ऍण्ड टेप्स आणि युनायटेड ७ याचे ते मालक होते.   

Updated: Nov 1, 2019, 01:03 PM IST
'मै खिलाडी तू अनाडी', 'जोश' या चित्रपटांच्या निर्मात्याचं निधन title=

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपट निर्मिती क्षेत्रात नावाजलेल्या आणि व्हीनस रेकॉर्ड्स ऍण्ड टेप्स आणि युनायटेड ७ची मालकी असणाऱ्या चंपक जैन यांचं गुरुवारी निधन झालं. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचं निधन झाल्याचं कळत आहे. 

खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'मै खिलाडी तू अनाडी' या आणि शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'जोश' या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. 
जैन यांच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली. सोनू सूद, मिका सिंग, गुरप्रीत कौर चड्ढा यांनी जैन यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. 

Film producer Champak Jain dies of brain hemorrhage

चंपक जैन यांच्या अकाली मृत्यूमळे आपल्याला अतीव दु:ख झाल्याचं म्हणत त्यांच्यासोबतच्या काही अविस्मरणीय आठवणी असल्याचं अभिनेता सोनू सूद सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाला.  तर, जैन यांच्या निधनाचं वृत्त कळताच आपल्याला धक्का बसल्याचं म्हणत त्यांच्या सढळ हस्ते इतरांच्या मदत करण्याच्या वृत्तीला मिका सिंगने सलाम केला. या सेलिब्रिटींशिवाय इतरही बऱ्याच सेलिब्रिटींनी जैन यांना श्रद्धांजली वाहत या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला आपली साथ असल्याचं स्पष्ट केलं.