close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO: भन्साळींच्या 'मलाल'मधून या स्टारकिड्सचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

'मलाल'मधून स्टार किड्सच बॉलिवूडमध्ये पदार्पण 

Updated: May 22, 2019, 01:09 PM IST
VIDEO: भन्साळींच्या 'मलाल'मधून या स्टारकिड्सचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्टार किड्स डेब्यू करताना दिसत आहेत. आता संजय लीला भंन्साळी यांचा आगामी चित्रपट 'मलाल'मधून पुन्हा एकदा दोन स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. संजय लीला भंन्साळी यांची भाची शरमिन सहगल आणि जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान हे दोघे 'मलाल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'मलाल'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ट्रेलरला प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित 'मलाल' चांगलाच चर्चेत होता. 'मलाल'चा ट्रेलर समोर आल्यानंतर संजय लीला भंन्साळी यांच्या जुन्या ऐतिहासिक भव्य सेटची इमेज बाजूला सारुन या चित्रपटात सामान्य कुटुंबातील, सामान्य घरात राहणाऱ्या व्यक्तीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. 

शरमिन सहगलने भंन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्यावेळी 'तिचं वजन जवळपास 85 ते 90 किलो होतं. परंतु शरमिनला आधीपासूनच अभिनेत्री होण्याची इच्छा होती. आज ती जे काही आहे त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली असून हा क्षण माझ्यासाठी अतिशय मोठा, भावनिक असल्याचं' भंन्साळी यांनी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी म्हटलं. 

याआधी 2008 मध्ये संजय लीला भंन्साळी यांनी दोन स्टार किड रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांना 'सावरिया' चित्रटातून बॉलिवूडमध्ये संधी दिली होती. आता मीजान आणि भंन्साळी यांची भाची शरमिन 'मलाल'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. भंन्साळी आणि टी सीरीज यांनी एकत्र 'मलाल'ची निर्मिती केली असून येत्या 28 जून रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.