आईचं टक्कल पाहून आयुषमानच्या मुलाला पडला 'हा' प्रश्न...

ताहिरा गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देत आहे. 

Updated: May 22, 2019, 12:41 PM IST
आईचं टक्कल पाहून आयुषमानच्या मुलाला पडला 'हा' प्रश्न...
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत अनेकांसाठीच प्रेसणास्त्रोत असणाऱ्या अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांच्या नात्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. काही महिन्यांपूर्वी ताहिराला कर्करोग अर्थात कॅन्सर या आजाराचं निदान झालं आणि त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. पण, या प्रसंगातही ताहिरा आणि आयुषमानने धीराने प्रत्येक दिवस पुढे नेला. ताहिराने वेळीच उपचार सुरु केली आणि बऱ्याच अंशी तिने या आजारावर मातही केली. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, या प्रवासात सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे ताहिरा आणि तिच्या कुटुंबीयांचा या कठिण प्रसंगातही असणारा सकारात्मक दृष्टीकोन. 

मुळात आजाराची बातमी त्यांनाही धक्का देऊन केली. पण, हा धक्का पचवत ताहिराने नव्या उमेदीने आयुष्य जगण्यास सुरुवात केली. यादरम्यान, आपल्या आईमध्ये होणारे बदल हे ताहिरा आणि आयुषमानच्या मुलापासूनही लपलेले नव्हते. त्याच्या मनात अनेक प्रश्नही येत होते, त्या प्रश्नांना अनोख्या पद्धतीने ताहिराने उत्तरं दिली. 

केमोथेरेपीमुळे आपली केसगळती होणार हे ताहिराला ठाऊक होतं. त्यासाठी तिने केसांता टोप, विविध प्रकारचे स्कार्व्ह वगैरे तयारही ठेवले. पण, एका वळणावर जाऊन अखेर तिने टक्कलच करण्याचा निर्णय घेतला. 'पिंकव्हिला'च्या 'नो लेबल्स अटॅच्ड' या नव्या कार्यक्रमात तिने याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या. 

आजाराशी लढताना सौंदर्याच्या नव्या परिभाषा तिला गवसत गेल्या. याचविषयी सांगत ती म्हणाली,  'ज्या दिवशी मुलाने माझं टक्कल केलेलं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात काही प्रश्न आले. मी पुरुषांना तर टक्कल केलेलं पाहिलं आहे पण, माझ्या आईला असं का करावं लागल? हा प्रश्न त्याला भेडसावत होता. त्याने मला त्याच्या मित्रांना न भेटण्यास सांगितलं होतं.' 

मुलाने त्याच्या मित्रांना न भेटण्यास सांगूनही ताहिराने त्याच्या मित्रांची भेट घेतली. जवळपास १५ ते २० मिनिटांनंतर हे सारंकाही अगदी नेहमीचं असल्याचं त्यांच्याही लक्षात आलं. त्या दिवशी आपण त्या मुलांना सौंदर्याची नवी परिभाषा समजावून सांगितली होती, असं ताहिरा सांगते. ताहिराचा हा अंदाज फक्त तिच्य़ा मुलापुरताच सीमित नसून, स्वत:च्या आणि आयुषमानच्या जीवनावरही तिने या आव्हानातच्मक प्रसंगाचा तणाव येऊ दिला नाही. किंबहुना आयुषमानच्या आगामी चित्रपटांसाठीही ती त्याला प्रेरणा देत राहिली. याच सकारात्मक वृत्तीमुळे गंभीर आजाराशी लढणाऱ्यांसाठी ताहिरा एक आदर्श असा प्रेरणास्त्रोत ठरत आहे.