Malaika-Arjun Engagement: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. अथिया शेट्टी-केएल राहुल (Athiya Shetty-KL Rahul), सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी (Siddharth Malhotra and Kiara Advani) अशा काही जोड्या लग्नबंधनात अडकल्या. अशात आता बॉलिवूडमधील सर्वात चर्चित असलेलं कपल्स म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor) आणि मलायका अरोरा (malaika arora) हे दोघे ही लवकरच साखरपुडा करणार आहेत. अनेक वर्ष या दोघांनी नातं लपवून ठेवल्यानंतर गेल्यावर्षी दोघांनी सोशल मीडियावरही नात्याची कबूली दिली होती. मात्र हे दोघे लग्न (Malaika-Arjun Engagement) कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता त्याचंही उत्तर मिळालं आहे.
वाचा: 'Lip Kiss....',आलिया भट्ट आणि रेखा यांचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, पाहा VIDEO
अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. चाहत्यांना देखील दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडते. गेल्या अनेक वर्षांपासून मलायका – अर्जुन (Malaika-Arjun Engagement) एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीला मलायका-अर्जुन आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलत नव्हते. मात्र कालांतराने या दोघांनी बिनधास्तपणे सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली होती. अलीकडे दोघेही सतत सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. अशातच या दोघांनी आता लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.
Breaking news: #MalaikaArora & #ArjunKapoor will get engaged next week in Paris !!! pic.twitter.com/jBOY0bJ0OA
— Umair Sandhu (@UmairSandu) February 20, 2023
याबाबत ट्रेड एक्सपर्ट उमैर संधू (Umair Sandhu tweet) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मलायका आणि अर्जुनचा साखरपुडा होणार असल्याचे सांगितले आहे. 'ब्रेकिंग न्यूज, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढच्या आठवड्यात पॅरिस येथे साखरपुडा करणार आहेत' असे ट्वीट करत सोशल मीडियावर माहिती दिली. पॅरिसमधील त्यांच्या साखरपुड्याला काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मार्च महिन्यात ते लग्नाचे प्लानिंग करत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु याबाबत मलायका आणि अर्जुनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.