Malaika Arora ची आगळी-वेगळी स्टाईल! कॅमेरा बघून बदलते चाल; फिटनेसच्या बहाण्याने स्पोर्ट्स ब्रामध्ये दाखवलं सौंदर्य

जेव्हा-जेव्हा मलायका कॅमेरासमोर येते तेव्हा तिची चाल बदलते. आणि म्हणूनच सोशल मीडिया युजर्स तिला नेहमी ट्रोल करतात. 

Updated: Jan 3, 2023, 08:10 PM IST
Malaika Arora ची आगळी-वेगळी स्टाईल! कॅमेरा बघून बदलते चाल; फिटनेसच्या बहाण्याने स्पोर्ट्स ब्रामध्ये दाखवलं सौंदर्य  title=

Malaika Arora Photos : मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असते. कदाचित हेच कारण असावं, जेव्हा मलायका पब्लिक प्लेसमध्ये येते तेव्हा पापाराझी तिच्या मागे-मागे येतात. मलायका देखील स्टाईल मारण्यासाठी काही कमी नाही. जेव्हा-जेव्हा ती कॅमेरासमोर येते तेव्हा तिची चाल बदलते. आणि म्हणूनच सोशल मीडिया युजर्स तिला नेहमी ट्रोल करतात. फिटनेस आणि योगाच्या बहाण्याने मलायका (Malaika Arora Gym Look) ब्रामध्ये आपली फिगर दाखवताना दिसते. 

मलायका अरोरा नुकतीच मुंबईच्या रस्त्यांवर स्पॉट झाली. मलायका (Malaika Arora) ने जसं कॅमेरे पाहिले तशी तिने तिची चालही बदलली. मलायका जेव्हा-जेव्हा पापाराझींसमोर येते तेव्हा-तेव्हा तिची अचानक चाल बदलते.

मलायका अरोरा कॅमेरासमोर आपली स्टाईल आणि अंदाज अनोखा करताना दिसते. सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी मलायका नेहमी स्पोर्ट्स ब्रा घालून कॅमेरासमोर येते.

मलायका अरोराच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लूक खूप आवडतो. मलायका तिच्या रिलेशनशिपमुळेही  सोशल मीडियावरही खूप चर्चेत असते. मलायका आणि अर्जुनचे रोमँटिक फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

जर मलायका अरोराच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर तुम्हाला दिसून येईल की, ती बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. आजकाल काही ब्रँड्सचे समर्थन करून ती आपला खर्च चालवत आहे. 

अलीकडेच मलायका अरोराने ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टार स्पेशल मूव्ह इन मलायकासोबत केलं. यामध्ये मलायकाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गुपिते उघड केली होती.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x