'सकाळी शोक सभा आणि रात्री डिनर...', अर्जुन आणि मलायका ट्रोलिंगचे शिकार

मलायका आणि अर्जुनचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Updated: Nov 13, 2022, 01:10 PM IST
'सकाळी शोक सभा आणि रात्री डिनर...', अर्जुन आणि मलायका ट्रोलिंगचे शिकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि त्याची गर्लफ्रेंड मलायक अरोरा (Malaika Arora) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, आता त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. (Malaika And Arjun Got Trolled)

अर्जुन आणि मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघं एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. अर्जुन आणि मलायकानं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. अर्जुन आधी मलायकाला गाडीत बसवतो आणि नंतर तो स्वत: गाडीत बसतो. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अर्जुन आणि मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवाते केली आहे. 

मलायका आणि अर्जुनचा व्हिडीओ पाहा -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायका आणि अर्जुनला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्याचे कारण म्हणजे, अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आलं. त्याच्या अखेरच्या प्रवासात अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. त्याचवेळी मलायकाही वीरच्या अंत्यसंस्काराला पोहोचली होती. पण त्याच रात्री ती डिनर डेटला जाताना दिसली. यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी तिला ट्रोल करत म्हणाला, 'सकाळची शोक सभा आणि रात्री डीनर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ती तिच्या मुलासाठी काय उदाहरण ठेवत आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'वृद्ध आईचा आधार तिचा मुलगा अर्जुन आहे.' आणखी एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'आई आणि मुलगा.' (Malaika Arora Gets Brutally Trolled After She Spotted For Dinner With Arjun Kapoor After Siddhaanth Vir Surryavanshi Funeral) 

हेही वाचा : आर्यन खानसोबत फोटो शेअर करत अनन्या पांडे म्हणाली, 'माझा पहिला आणि...'

काही दिवसांपूर्वी मलायकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने कॅप्शन दिले की, 'मी हो म्हणाले.' यानंतर लोकांना असे वाटले की अर्जुननं या मलायकाला लग्नासाठी प्रपोज केले आहे, ज्याची गुड न्यूज ती तिच्या चाहत्यांना देत आहे. मात्र, तसे झाले नाही. नंतर हे स्पष्ट झाले की त्यांचा एक शो येत आहे, ज्यासाठी तिनं ही ट्विस्ट पोस्ट शेअर केली. दरम्यान, त्यांचे चाहते मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x