47 व्या वर्षातही मलायका दिसते सुपरहॉट! तिच्या फिगरचं हे खास रहस्य

मलायका आपल्या फिटनेसबाबत खूप शिस्तप्रिय आहे

Updated: Jul 15, 2021, 09:56 PM IST
47 व्या वर्षातही मलायका दिसते सुपरहॉट! तिच्या फिगरचं हे खास रहस्य

मुंबई : इंडस्ट्रीमधली फिट अभिनेत्री कोण आहेत असं जर तुम्हाला विचारलं गेलं तर मलायका अरोराचे नाव नक्कीच या यादीमध्ये सगळ्यात आधी तुमच्या समोर येईल. 23 ऑक्टोबर 1973 रोजी जन्मलेली मलायका 47 वर्षांची आहे. मलायकाला 18 वर्षाचा मुलगा आहे, मलायकाची फिट बॉडी पाहून लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की, मलायका ईतकी फिट असलेली अभिनेत्री नेमकं करते तरी काय?

या प्रश्नाचं उत्तर मलाइकानेच दिलं आहे. मलायकाच्या म्हणण्यानुसार तिच्या फिटनेसचं रहस्य म्हणजे नियमित योगा आणि संतुलित आहार. एका रिपोर्टनुसार मलायका आपल्या फिटनेसबाबत खूप शिस्तप्रिय आहे आणि कधीही योगा सोडत नाही. मलायकाच्या मते, 'माझ्या तंदुरुस्तीचे रहस्य म्हणजे योग आणि मधूनमधून फास्ट करणं'. मलायका उपवासात, संपूर्ण 17 ते 18 तास उपवास ठेवते म्हणजे काहीच खात नाही.

मलायका योगासह मध्यंतरीच्या उपवासाच्या नमुन्याचं अनुसरण करते आणि संध्याकाळी 7-7:30 दरम्यान दिवसाची शेवटचं जेवण घेते. यानंतर मलायका काहीच खात नाही आणि सकाळी 9 से 9:30 दरम्यान भरपूर ज्युस पिऊन आपला उपवास सोडते, म्हणजे ती किमान 12-13  तास काहीच खात नाही. मलायका म्हणाली की, 'मी सकाळी उपवास करते ज्यूस,  तूप, नारळपाणी, जिरे आणि कोमट पाणी इ. द्रवरूप घेते'.

अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार ती दिवसाची सुरुवात पाण्याबरोबर काही ड्राय फ्रूट्स खाऊन करते. मलायका असंही सांगते की दिवसा योग्य आहार घेणं मला आवडतं ज्यात कार्ब, फॅटची योग्य मात्रा आहे. मलायका फक्त घरगुती अन्न खाते.