मलायका अरोराने घेतला कोरोना लसचा पहिला डोस, अशी दिली प्रतिक्रिया

मलायकाने घेतला पहिला डोस

Updated: Apr 2, 2021, 03:18 PM IST
मलायका अरोराने घेतला कोरोना लसचा पहिला डोस, अशी दिली प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora)सोशल मीडियावर खूप ऍक्टीव असते. ती तिच्या पर्सनल आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत करते. अलीकडेच मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. त्यामध्ये ती कोरोना लसचा पहिला डोस घेताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका अरोराने फोटो शेअर करताना सोबत पोस्ट लिहिली आहे. कोविड लसचा पहिला डोस मी घेतला होता, कारण पूर्णपणे #wereinthist! चला योद्धांनो, या #WarAgainstVirus वर विजय मिळवूया. आपला डोस घ्यायला विसरू नका! आणि हो मी लस घेण्यास पात्र आहे. फोटोत ती व्हाईट क्रॉप टॉप आणि जॉगर्सवर दिसतेय. तिने मास्क देखील घातलंय. तसेच तिने पेन रिलीफ पट्टी देखील घातलीय.

बीग बींनी घेतली वॅक्सिन

अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनी देखील कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. गुरुवारी रात्री उशिरा 78 वर्षाच्या बीग बींनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मी आज दुपारी कोरोना लस घेतली. सर्व ठीक आहे.'

मलायका 47 वर्षांची 

मलायका अरोरा 47 वर्षांची असून 1 एप्रिलपासून सर्व 45 वर्षांच्या व्यक्तींसाठी लसीकरण सुरू झाले आहे. अशावेळी मलायकाने वेळ न दवडता वॅक्सिन घेतली. मलायकाला कोरोना होऊन गेलाय. अशा परिस्थितीत सावधानता बाळगून तिने लस घेतली आहे.