कंगना रणौतने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्रींवर साधला निशाना

कंगनाने बॉलिवूड गँगच्या विरोधात केलं ट्विट 

Updated: Apr 2, 2021, 01:30 PM IST
कंगना रणौतने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्रींवर साधला निशाना  title=

मुंबई : कंगना रानौत ही सोशल मीडियावर कायम ऍक्टिव असते. कंगना आपली कोणतीही प्रतिक्रिया अतिशय सडेतोडपणे देते. यामुळे ती कायमच चर्चेत असते. कंगनाचं आता आणखी एक ट्विट समोर आलं आहे. ज्यामध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्रींना प्रश्न विचारला आहे. 

कंगनाच्या एका फॅन पेजवर तिच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ मोंटाज शेअर केला आहे. यामध्ये दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, करीना कपूर, प्रियंका चोप्रा आणि तापसी पन्नू यांचं कौतुक करत आहे. कंगना या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच कंगना या अभिनेत्रींवर निशाणा साधताना दिसली. 

कंगना आपल्या ट्विटमध्ये लिहिते की,'इंडस्ट्रीत अशी कोणतीच अभिनेत्री नाही ज्याचं मी समर्थन करते. आणि कौतुक करते.' हा त्याचा पुरावा आहे. मात्र यामधील कोणत्याच अभिनेत्रीने माझं समर्थन केलेल नाही. किंवा माझं कुणी कौतुक केलं आहे. तुम्ही कधी विचार केला आहात का? त्या माझ्या विरोधात का एकत्र आल्या? मी आणि माझ्या कामाबद्दल असं षडयंत्र का? 

दुसऱ्या ट्विटमध्ये कंगना लिहिते की,'तुम्ही बघू शकता की, त्यांनी मला कधी कॉल करून अथवा मॅसेज करून मला त्यांच्या सिनेमाच्या प्रीव्ह्यूला कधी बोलावलं तर मी गेलं. ते मला फुलं पाठवतात. मात्र मी जेव्हा मी माझ्या सिनेमांना त्यांना बोलवायला कॉल केला तर त्यांनी तो कधी रिसिव केला नाही. त्यामुळे आता मी प्रत्येक दिवशी त्यांचा क्लास घेते.'