करण जोहरसोबतच्या 'या' फोटोवरून मलायका अरोरा झाली ट्रोल...

सोशल मीडियावर कधी कोणता सेलिब्रिटी कोणत्या कारणामुळे ट्रोल होईल हे सांगू शकत नाही. 

Updated: Dec 16, 2017, 03:59 PM IST
करण जोहरसोबतच्या 'या' फोटोवरून मलायका अरोरा झाली ट्रोल... title=

मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणता सेलिब्रिटी कोणत्या कारणामुळे ट्रोल होईल हे सांगू शकत नाही. 
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या गोल्डन ड्रेसवरून, ऐश्वर्या राय तिच्या लिपस्टिकवरून ट्रोल  झाली होती. आता मलायका अरोरादेखील ट्रोल झाली आहे. 

काय होतं कारण ? 

मलायकाला आता तिच्या ड्रेसवरून ट्रोल करायला सुरूवात झाली आहे. गुरूवारी मयायका अरोराने ख्रिसमस पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावेळेस मलायकाच्या मैत्रिणी करिना कप्य्य्र, करिष्मा कपूर, अमृता अरोरा सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या सोबतच फिल्ममेकर करण जोहरदेखील सहभागी झाला होता.  

का झाली मलायका ट्रोल ? 

 

मलायकाने पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यातील काही फोटो सोशल मीडियामध्ये पसरले. मलायकाच्या ड्रेसची लेन्थ लहान असल्याने अनेकांनी त्यावर टीका केली. इंस्टाग्राम पोस्टवर याबाबत अनेक नेटकर्‍यांनी लिहले आहे.