मुंबई : फिटनेसच्या गप्पा सुरू आहेत आणि मलायका अरोराचे नाव नाही असं होणार नाही. वयाच्या या टप्प्यावरही ती तरुण मुलींसाठी फिटनेसचे नवे गोल्स सेट करतेय. एवढंच नव्हे तर फिटनेसच्या बाबतीत नव्या तरुणींनाही मागे टाकत आहे. प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये परफेक्ट बॅलेंस साधण आणि यामध्ये स्वत:साठी वेळ काढून फिट ठेवणं हे मलायकाकडून शिकण्यासारखं आहे.
काहीही होऊदे ती आपल्या फिटनेससोबत तडजोड करत नाही. रोज सोशल मीडियावर व्हायरल होणारे तिचे फोटो याचा पुरावा आहेत.
यातच जिममधील तिचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. २३ ऑगस्ट १९७३ ला जन्मलेली मलायका आता ४५ वर्षांची आहे. ती रेग्यूलर जिमला जाते.
आपल्या फॅशनवरही तिचं खास लक्ष असतं.
ती नेहमी नव्या आणि हॉट लूकमध्ये दिसते.
बुधवारी तिचे आयटम सॉंग 'हेल्लो हेल्लो' रिलीज झालंय. लवकरच रिलीज होणाऱ्या 'पटाखा' या सिनेमातील ते गाणं आहे. या गाण्याला युट्यूबवर रिलीज करण्यात आलं. प्रत्येक गाण्याप्रमाणे यामध्येही मलायकाचे ठुमके पाहायला मिळत आहेत.