कधीकाळी करोडो कमावणारी अभिनेत्रीवर आली रस्त्यावर!​

या फोटोत मल्लिकाला ओळखणंही कठिण आहे

Updated: Jun 16, 2018, 12:35 PM IST
कधीकाळी करोडो कमावणारी अभिनेत्रीवर आली रस्त्यावर!​ title=

मुंबई : आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आज केवळ नावालाच 'मल्लिका' उरलीय... एकेकाळी करोडो रुपये कमावणाऱ्या मल्लिकावर आज अशी वेळ येईल, असं कुणाला काय खुद्द मल्लिकालाही स्वप्नातही वाटलं नसेल... एकेकाळी आपल्या हॉटनेसमुळे कायम चर्चेत असलेल्या मल्लिकाचे तारे आज गर्दीत हरवलेत... मल्लिकाला याआधी पॅरिसस्थित एका फ्लॅटमधून बाहेर काढण्यात आलं होतं... त्यानंतर आता मल्लिकाचा एक फोटो समोर आलाय. या फोटोत मल्लिका मुंबईच्या रस्त्यांवर दिसतेय.

या फोटोत मल्लिकाला ओळखणंही कठिण आहे... मुंबईतल्या एका बर्फाच्या गाडीवर बर्फाचा गोळा बनवताना आणि खाताना मल्लिकाला पाहिलं गेलं... यावेळी ना तिच्यासोबत तिच्यासोबत कुणी सेवक होतं... ना तिचे फॅन्स... 


मल्लिका शेरावत

यापूर्वी मल्लिका शेरावत आणि तिचा बॉयफ्रेंड सीरिल यांना पॅरिसस्थित फ्लॅटसाठी ८० हजार युरो म्हणजेच जवळपास ६४ लाख रुपये जमा करायचे होते... परंतु, ते काही त्यांन जमलं नाही.... त्यामुळे फ्रान्सिसी कोर्टाच्या आदेशानुसार मल्लिकाला हे घर रिकामं करावं लागलं, अशी बातमी समोर आली होती... परंतु, ही बातमी आल्यानंतर मल्लिकानं या चर्चेला नकारह देत आपलं पॅरिसमध्ये कोणतंही घर नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.