मंदामाई शिकलेली न्हवती का? गाणं व्हायरल

मंदामाई गाण्याचा व्हिडीओ बातमीत खाली पाहा

Updated: Jun 25, 2018, 02:21 PM IST

मुंबई : मंदामाई शिकलेली न्हवती का? या गाण्याने सर्वांना वेड लावलं आहे. शांताबाई गाण्यासारखीच गाण्याची क्रेझ वाढतेय. यूट्यूबवर या गाण्याला आतापर्यंत १ कोटी लोकांनी ऐकलं आहे. जयेश जाधव असं या गायकाचं नाव आहे, जयेश जाधव  संगीत शिक्षक आहेत. हे गाणं परेदशातील मराठी लोकांमध्ये हीट झाल्याचं जयेश सांगतो. मंदामाई शिकलेली नव्हती का? ही एक कल्पना असल्याचं जयेश सांगतो. जयेशलाही वाटलं नव्हतं की, हे गाणं एवढं गाजेल. जयेशने या गाण्याचं शुटिंग करून यूट्यूबवर अपलोड केलं. आणि ते प्रचंड हिट झालं

एकदा जयेशने रिक्षाने जात होता, तेव्हा रिक्षाचालक हे गाणं गात होता, आणि म्हणत होता की, भारीय ना हे गाणं, आपल्याकडच्याच मुलाने म्हटलंय, जाम हिट होतंय हे गाणं, त्यावर जयेशने सांगितलं की, तो मुलगा मीच आहे, त्यावर रिक्षा चालकालाही भरपूर आनंद झाला आणि तो म्हणाला, चल जाऊ दे, पैसे नको देऊस रिक्षा भाड्याचे.

जयेश आता लवकरच एक महाराष्ट्र गीत घेऊन येत आहे. तसेच याच टोनमध्ये एक गावराण गाणं येत असल्याचंही तो सांगतोय, आता गणपती येतोय, तर गणपतीवरही गाणं येणार असल्याचं जयेशने सांगितलं.