मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मंदाना करीमीने बॉलिवूडमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बिग बॉस शोमध्ये (बिग बॉस 16 मध्ये साजिद खान) लैंगिक शोषणाचा आरोप असलेला चित्रपट दिग्दर्शक साजिद खानच्या सहभागामुळे दु:खी झाल्याने तिने हा निर्णय घेतला आहे.
साजिद खान बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून आल्याने मंदानाने मीडियासमोर नाराजी व्यक्त केली आहे. महिलांचा आदर नसलेल्या या पुरुषांमुळे इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा नसल्याचं सांगत या अभिनेत्रीने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. मंदानापूर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही बिग बॉस शोमध्ये साजिद खान येण्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
स्त्री असणं दुखावतं
जेव्हा तिला विचारलं गेले की ती बॉलिवूड सोडण्याचा निर्णय का घेत आहे? यावर अभिनेत्री म्हणाली, "एक स्त्री असणं, हे सोपं नाही. मला आनंद कुठे मिळतो ते पाहावं लागेल कारण एका गोष्टीसाठी आयुष्य खूप कमी आहे... असे लोक आहेत जे तडजोड करायला आणि तोंड बंद ठेवतात, आजूबाजूच्या गोष्टींबद्दल बोलत नाहीत कारण याचा विचार करून की, समोरच्या व्यक्तीला काय फरक पडेल"
साजिदला शोमध्ये पाहून मंदाना नाराज झाली होती
मंदानाच्या म्हणण्यानुसार, बिग बॉस शोमध्ये साजिद खानला पाहून ती नाराज झाली. ती म्हणाली- "हे मला दु:खी करतंय. खरं सांगायचं तर हेच कारण आहे की मी गेल्या सात महिन्यांपासून काम केलं नाही. मी आता काम करत नाही. मी कोणत्याही ऑडिशनला गेलेले नाही. आणि मला करायचंही नाही. मला अशा उद्योगात सहभागी व्हायचं नाही जिथे महिलांचा आदर नाही." मंदाना शेवटची लॉक-अप रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.