170 कोटींचा मालक आहे मनोज बाजपेयी?; अभिनेता म्हणतो, निर्मात्यांनी माझा पगार...

Manoj Bajpayee Net Worth: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मनोज बाजपेयीची एकूण संपत्ती 170 कोटी असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर आता अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 25, 2023, 11:49 AM IST
170 कोटींचा मालक आहे मनोज बाजपेयी?; अभिनेता म्हणतो, निर्मात्यांनी माझा पगार...  title=
Manoj Bajpayee reacts to reports claiming his net worth rs 170 crore

Manoj Bajpayee Net Worth: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee)  बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक वेबसिरीज, चित्रपटातून त्यांने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. अशातच अलीकडेच एक  चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मनोज बाजपेयीची संपत्ती एकूण 170 कोटी इतकी आहे, असा दावा केला जात आहे. या चर्चा व्हायरल झाल्यानंतर खुद्द अभिनेत्यानेच या चर्चांवर मौन सोडलं आहे. 

द फॅमिली मॅन ही वेबसिरीज हिट झाल्यानंतर मनोज बाजपेयीची एकूण संपत्ती 170 कोटी इतकी असल्याची चर्चा रंगली होती. यावर उत्तर देताना मनोजने एका मुलाखतीत त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. तसंच, अशा बातम्यांची त्याने खिल्लीदेखील उडवली आहे. अभिनेता म्हणतो की, मी अजूनही स्ट्रगल करतोय. माझ्या बँक खात्यात काही पैसे येण्यासाठी मी आर्थिकदृष्ट्या अजूनही संघर्ष करतोय. तसंच, पैसे कमवणे याली मी नेहमीच दुय्यम स्थान दिलं आहे. माझ्यासाठी पहिली प्राथमिकता ही चांगल्या कथावर लक्ष्य केंद्रित करणे हिच असेल, असंही त्याने म्हटलं आहे. 

मी ज्याप्रकारचे काम करतो, अलीगढ, भोसले या चित्रपटातील मी एक हिस्सा आहे. त्यामुळं इतके पैसे कमवणे असंभव आहे. मी अजूनही माझ्या बँक खात्यात जास्तीचे पैसे येण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, आता या बातम्या वाचल्यानंतर मला आशा आहे की निर्माते आता माझा पगार वाढवली. जर खरंच असं झालं तर मग मी आरामात जगू शकतो, असं मनोजने गमतीत म्हटलं आहे. 

माझ्याकडे जर इतकी संपत्ती आली तर मी एका दूर आणि शांती ठिकाणी जाऊन राहू शकतो. व तिथेच माझं जीवन आरामात व्यतित करु शकतो, असंही मनोज वाजपेयी यांनी म्हटलं आहे.

तसंच, तगडी रक्कम पाहून कधी कोणत्या प्रोजेक्टला होकार दिला आहेस का? असा प्रश्न अभिनेत्याला विचारला असता त्याने त्यावर लगेचच उत्तर दिलं आहे. असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही, असं त्याने म्हटलं आहे. कारण मला माहितीये मी असं कधीच करु शकत नाही. मला जर अशाप्रकारचे काम करायचे असते तर ते मी 25 वर्षांपूर्वीच केले असते. मी फक्त पैशांसाठी काम करु शकत नाही. माझ्यासाठी कौशल्य आणि छंद हे खूप महत्त्वाचे आहेत. मी जे काम करतो त्याबदल्यात माझ्या प्रेक्षकांनी आणि शुभचिंतकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी आणि मला शुभेच्छा द्याव्यात, इतकीच मी आशा करतो, असं तो म्हणाला आहे.