Manoj Muntashir On Why He Changed His Name: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटामुळे वादात सापडलेले कथाकार आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) हे अनेक मुलाखतींमधून आपली बाजू मांडताना दिसत आहेत. 'आदिपुरुष'मधील वादग्रस्त संवाद बदलण्यात आले असले तरी मुंतशीर यांच्या मुलाखती सुरुच आहेत. मात्र आता मुंतशीर यांनी मुलाखती देऊन 'छपरी' भाषेचा बचाव करुन आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करु नये असं अनेकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे स्वत:चा बचाव करताना मुंतशीर हे अधिक वादग्रस्त विधानंही करत आहेत. नुकतेच त्यांनी 'बरजंगबली देव नसून भक्त आहे. आपण त्याच्या भक्तीच्या शक्तीमुळे त्याला देवाचं स्थान दिलं,' असं विधान केलं आहे. या वक्तव्यावरुन वाद सुरु असतानाच आता मुंतशीर यांनी नवीन वादाला तोंड फोडलं आहे. मुंतशीर यांनी स्वत:चं नाव मनोज शुक्ला असताना ते बदलून मनोज मुंतशीर का करुन घेतलं यासंदर्भातील विधान केलं आहे.
मनोज मुंतशीर यांनी शुक्ला अडनावाऐवजी मुंतशीर नाव लावण्यामागील कारण सांगितलं आहे. मात्र यावरुन तो ट्रोल होत आहे. नाव बदलण्यामागील तर्क सांगताना मनोज यांनी धार्मिक संदर्भ दिला होता. मुंतशीर हा उर्दू शब्द आहे. या शब्दाचा अर्थ विजेता तसेच व्यत्यय आणणारा असा होतो. एका जुन्या मुलाखतीमध्ये मनोज मुंतशीर यांनी "माझे वडील पुरोहित आहेत. जेव्हा ते शिवस्त्रोत्र म्हणायचे तेव्हा मी इस्लामिक वाक्य म्हणायचो, केवळ त्यांना विरोध दर्शवण्यासाठी म्हणूनच मी माझं नावही बदलून मुंतशीर असं करुन घेतलं," असं म्हटलं होतं. तसेच या मुलाखतीमध्ये मनोज यांनी शुक्ला अडनावाला फारसं वजन नाही म्हणूनही मी नाव बदलण्याचा विचार केला असाही खुलासा केला होता. आता हाच व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे.
अनेकांनी या व्हिडीओवरुन मनोज मुंतशीर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली असून त्यांच्यावर जोरदार टीकाही होताना दिसत आहे.
1)
Manoj Muntashir, Writer of Adipurush: "I changed my name from Shukla to Muntashir. My father is a Purohit, whenever he chanted the Shiv Stotra, I used to sing IsIamic verses to counter him."
And these were the people entrusted with making the 1st big-scale film adaptation of… pic.twitter.com/yqAssSMWZt
— Cogito (@cogitoiam) June 20, 2023
2)
This is the true character of Manoj Muntashir, the dialogue writer of Adipurush. Says when he changed his name from Shukla to Muntashir it changed him. "When my father used to sing the Shiv Stotra, I would sing Rasool Allah." Truly a pseudo secular clown. pic.twitter.com/NMJY2nWNtU
— Rakesh Krishnan Simha (@ByRakeshSimha) June 20, 2023
3)
Shukla mein wajan nahi tha isliye Muntashir ho gaya.
Ab dono ka fayda lena hai toh double engine ho gaya. pic.twitter.com/C5PCkX0lF7
— Rofl Gandhi 2.0 (@RoflGandhi_) June 18, 2023
मनोज मुंतशीर यांनी तेरी मिट्टी मे मिल जावा (केसरी), गलिया (एक व्हिलन), तेरे संग यारा (रुस्तम) अशी गाणी लिहिली आहेत. 'आदिपुरुष' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर धमक्या मिळत असल्याने मुंतशीर यांनी पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. त्यांना तशी सुरक्षा देण्यातही आली आहे.