धक्कादायक : सिद्धू मोसेवालाच्या हत्येनंतर बिग बॉस फेम मनू पंजाबीला जीवे मारण्याची धमकी

 प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येनंतर मनोरंजन विश्वात जीवे मारण्याच्या धमक्यांचं पर्व सुरू झालं आहे. 

Updated: Jun 29, 2022, 10:08 PM IST
धक्कादायक : सिद्धू मोसेवालाच्या हत्येनंतर बिग बॉस फेम मनू पंजाबीला जीवे मारण्याची धमकी title=

मुंबई : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येनंतर मनोरंजन विश्वात जीवे मारण्याच्या धमक्यांचं पर्व सुरू झालं आहे. याआधी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानलाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सलमानने या प्रकरणाचा साफ इन्कार केला असला तरी आता बिग बॉस फेम मनू पंजाबीबाबत मोठी बातमी येत आहे. खरं तर, मनू पंजाबीने दावा केला आहे की, सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणाऱ्या टोळीकडून त्यालाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

मनू पंजाबीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत
रिपोर्ट्सनुसार, मनू पंजाबीला नुकताच धमकीचा ई-मेल आला आहे. या मेलमध्ये मनू पंजाबीकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली जात आहे. या प्रकरणावरील मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनू पंजाबीने सांगितलं आहे की, मला त्यांच्याकडून 10 लाख रुपये देण्यास सांगण्यात आलं आहे. जर मी हे केलं नाही तर मलाही सिद्धू मुसेवालाप्रमाणेच मृत्युदंड दिला जाईल. ज्याने आपल्याला हा धमकीचा ई-मेल पाठवला तो दुसरा कोणी नसून सिद्धू मुसेवालाची हत्या करणारी टोळी असल्याचा दावा मनू पंजाबीने केला आहे.

पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली
मनू पंजाबीला ही धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. जयपूर पोलिसांनी या गुन्हेगाराला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, हा व्यक्ती मनू पंजाबीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. अशा परिस्थितीत पोलिसांच्या या यशाबद्दल मनू पंजाबीने सोशल मीडियावर आभार मानले आहेत.