'या' अभिनेत्रीमुळे करण जोहर आणि सारा अली खानची परदेशात नाचक्की 

सारा अली खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे 

Updated: Jun 30, 2022, 01:47 PM IST
'या' अभिनेत्रीमुळे करण जोहर आणि सारा अली खानची परदेशात नाचक्की  title=

मुंबई : आलिया भट्ट सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे.  अभिनेत्री सध्या तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग करत आहे. ज्यामध्ये गॅल गॅडोट मुख्य भूमिकेत असेल. शूटिंगच्या व्यस्त शेड्युलमधून ब्रेक घेत आलिया तिच्या मिंत्रासोबत फिरायला गेली. तिचा ग्रुपला लंच डेट एन्जॉय करायची होती. मात्र, आलियाने त्यांच्यासाठी टेबल बुक केलं नाही. याच कारणामुळे रिजर्वेशन अभावी बॉलिवूड स्टार्सना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळाला नाही. खरंतर आलिया आणि तिचा ग्रुप लंचला गेले होते पण आलियाच्या एका चूकीमुळे त्यांच्या ग्रुपची परदेशात फजिती झाली. या दरम्यानचा एक व्हिडिओ साराने सोशल मीडियावर शेअर केलाय.

साराने व्हिडिओ शेअर केला आहे
सारा अली खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये करण जोहर एका हॉटेल कर्मचाऱ्याला 4 लोकांसाठी टेबल देण्याची विनंती करताना दिसत आहे. ते हॉटेलमधल्या कर्मचाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. पण तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. यामुळे करणला लाज वाटते. मात्र, सारासोबत तो याची खिल्लीही उडवत होता. मनोरंजक गोष्ट म्हणजे यानंतर त्यांना रेस्टॉरंट सापडतं. यांच्यासोबत मनिष मल्होत्रादेखील होता. मनिषने आपल्या गेट टुगेदरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आलियाबाबत बोलयचं झालं तर नुकतीच आलियाने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिलीये.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका खास पोस्टद्वारे चाहत्यांना तिच्या गरोदरपणाची गोड बातमी दिली. तिने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये आलिया रणबीर कपूरसोबत हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली दिसत आहे. रणबीर देखील कॅप घातलेला दिसत आहे पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहीलं की, 'आमचं बाळ.. लवकरच येत आहे' बरं, आलिया आणि रणबीर आई-वडील होणार असल्याच्या बातमीवर सर्वजण  शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.