मराठी अभिनेते नागेश भोसले यांच्या लेकीचे फोटो पाहिलेत का? बॉडीबिल्डिंग क्षेत्रात डंका

आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत  Bollywood Star Kids चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असताना मराठी अभिनेत्याच्या मुलीने मात्र वेगळा मार्ग निवडत प्रसिद्धीचं शिखर गाठलं आहे

Updated: Nov 21, 2022, 10:24 PM IST
मराठी अभिनेते नागेश भोसले यांच्या लेकीचे फोटो पाहिलेत का? बॉडीबिल्डिंग क्षेत्रात डंका title=

Marathi Entertainment : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या स्टारकिड्सचा (StarKids) बोलबाला आहे. जान्हवी कपूर, सारा अली खान, सुहाना शाहरुख खान, सारा अली खान, न्यासा देवगन अशा अनेक स्टारकिड्सची सोशल मीडियावर (Social Media) चर्चा आहे. यापैकी काही जणींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे, तर काही जणी पदार्पणाच्या तयारीत आहेत. एकीकडे बॉलिवूड स्टारकिड्सची चर्चा असताना दुसरीकडे मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याच्या मुलीने मात्र वेगळा मार्ग निवडत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

मराठी सिनेमे आणि छोट्या पडद्यावर अनेक मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या नागेश भोसले (Nagesh Bhosale) यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवला आहे. 'प्यार वाली लव्ह स्टोरी', 'दुनियादारी', 'धग', 'गावठी', 'योद्धा', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'​ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये नागेश भोसले यांनी अभिनय साकारला आहे.

नागेश भोसलेंच्या लेकीने निर्माण केली वेगळी ओळख

नागेश भोसले यांच्या पत्नीचं नाव जॉ भोसले असं असून त्यादेखील कलाविश्वाशी निगडीत आहेत.  नाट्य निर्माती म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अनेकदा सेलिब्रिटींची मुलं आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कालविश्वात पदार्पण करतात. नागेश आणि जॉ यांच्या लेकीने वेगळी वाट निवडली आहे. नागेश भोसले यांच्या लेकीचं नाव कुहू भोसले (Kuhu Bhosale) असून ती एक प्रसिद्ध बॉडी बिल्डर (Body Builder) आहे. फिटनेसफ्रिक असलेल्या कुहूने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 

अॅमेच्युअर ऑलंपियामध्ये ब्राँझ मेडल
कुहूने अॅमेच्युअर ऑलंपियामध्ये ब्राँझ मेडल पटकावलं आहे. बॉडिबिल्डिंगबरोबच कुहू ट्रेनर म्हणूनही काम करते. कुहूने वयाच्या 17 व्या वर्षी बॉडिबिल्डिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिच्या आई-वडिलांनीही यासाठी तिला प्रोत्साहनच दिलं.

यानंतर कुहूने मागे वळून पाहिलं नाही. आतापर्यंत तिने अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x