फोटोतील 'या' लहान मुलीला ओळखलंत का? 'ही' अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि बिनधास्त

Marathi Actress childhood photos viral :  मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शेअर केला बालपणीचा फोटो, या अभिनेत्रीचा फोटो सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Updated: Jun 27, 2023, 11:18 AM IST
फोटोतील 'या' लहान मुलीला ओळखलंत का? 'ही' अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि बिनधास्त  title=

Marathi Actress News in Marathi : आपल्या आवडत्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांशी शेअर करतात. आता अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. 

तुम्ही या फोटोतील अभिनेत्रीला ओळखलंत का? ही अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi) असून हिने नुकताच सोशल मीडियावर बालपणीचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री हेमांगी कवी हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने लिहिले की, ही तिच व्यक्ती आहे का? हेमांगीच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती मिळताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने फोटोवर लिहिले की, तू तशीच दिसत आहेस. दुसऱ्या युजरने लिहिले की, तुम्हाला पहिल्यापासून वेगळी प्रेरणा मिळते. सावळा रंग सोन्यालाही मागे टाकतो. तुम्ही नेहमी परिपूर्ण आणि सुंदर दिसता. दुसरा यूजर्स म्हणाला, ते काहीही असो आय लव्ह यू. तू भारी आहेस, दिसणे तर सुंदरच पण माणूस म्हणून त्याहून सुंदर...  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगीने आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध क्षेत्रात काम केले आहे. या वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. हेमांगी कवी ही कायमच तिच्या वैयक्तिक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते.

हेमांगीची 'बाई, बब्स आणि ब्रा'ची चर्चा

काही महिन्यांपूर्वी हेमांगीने फेसबुकवर 'बाय, बुब्स आणि ब्रा' अशी बोल्ड पोस्ट केली होती. त्यामुळे बरीच चर्चत आली. अनेकांनी तिला या बोल्ड पोस्टने ट्रोल ही केले. पण या ट्रोलिंग मुळे हेमांगी मात्र थांबली नाही. आजही ती वैयक्तिक आयुष्याबद्दल चे विचार अगदी आकस्मिकपणे मांडत असते. आता तर तिने अनेक प्रायव्हेट गोष्टींबद्दल ही खुलासे केलेय. हे ऐकून प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.

हेमांगी कविचेचे आई-वडिलांबद्दल खुलासा

नुकतंच हेमांगी कवीने आपल्या आई-वडिलांबद्दल आणि घरातल्या त्यांच्या एकांताबद्दल काही खुलासे केले आहेत. हे ऐकून अनेक प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले की, घरात अशा खाजगी गोष्टी सर्वांसमोर उघडपणे दाखविणे योग्य आहे का? आपण अजूनही भारतात राहतो, अमेरिकेत नाही.’ असंही मत अनेकांनी व्यक्त केली आहेत.