Marathi Actress Daughter Sudoku India Fastest Player : सुडोकू हे कोडे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकजण हे कोड सोडवण्याचे प्रचंड शौकिन आहे. या कोड्यांना पूर्ण सोडवल्याशिवाय काहींचा दिवसच जात नाही. आता हे कोडे वर्तमानपत्रासह ऑनलाईनही खेळता येणार येते. जगभरात 20 कोटींहून अधिक चाहते असलेल्या सुडोकू या खेळात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची मुलगी तल्लख आहे. विशेष म्हणजे ती भारतात सर्वात वेगाने सुडोकूचे कोडे सोडवते.
आई कुठे काय करते या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून राधिका देशपांडेला ओळखले जाते. राधिका देशपांडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिची लेक अंतराचा एक फोटो शेअर करत तिचे कौतुक केले आहे. भारतात सर्वात वेगाने सुडोकू खेळणाऱ्यांपैकी ती एक असल्याची माहिती राधिकाने दिली आहे.
अँड युअर टाइम स्टार्टस Now! सुपीक डोकी असलेल्यांसाठी एक गेम आहे. Sudoku. वर्तमानपत्रात हा तुम्हाला सापडेल. थोडक्यात सांगायचं झालं तर 'अंक कोडं' म्हणू या आपण. त्याचा ॲप ही आहे. ह्या मुलीनं लीलया हातात धरला आहे तो गेम 'सुडोकू'. लीलया ह्या करता म्हणते आहे कारण ही मुलगी नंबर वन ची प्लयेर आहे. भारतात सर्वात वेगाने खेळते अंतरा. सरासरी तिची स्पीड 1 min च्या जवळपास असते.
रोज सकाळी एक कोडं सोडवता सोडवता तिने पहिला नंबर गाठला आहे! मी तिला म्हटलं...
मी: बघू तरी तू कशी खेळते ते! (बघते तर काय एका मिनिटात एक लिमलेट ची गोळी संपवावी तसं सुडोकू संपवलं.) अगं हे काय इतक्या फास्ट? मला बघू तरी दिलं असतंस. इतकं सोप्पं आहे हे, तर मी पण खेलते.
अंतरा: सोप्पं नाही आहे. सर्वात हार्ड लेव्हल मी खेळले आत्ता.
मी: चल, काहीपण
अंतरा: अगं हो. मी फास्टेस्ट प्लेअर आहे भारतातली.
मी: चल, हे मात्र अतीच होतं आहे हं तुझं. (हळूच विचारलं) मस्करी करते आहेस न माझी?
अंतरा: अगं मी मस्करी का करू. खरंच मी नंबर वन वर आहे. साधारण महिना झाला.
मी: अगं तू हे मला इतक्या lightly कसं सांगू शकतेस. मला आधी सांगितलं का नाहीस?
अंतरा: अगं नंबर वन वर आहे पण वर्ल्ड वाइड 901 नंबर वर आहे.
मी: आधी मला दाखव कुठे लिहून येतं ते. आणि स्नॅप शॉट काढ. (तिने दाखवला)
अंतरा: आता तू आजी आजोबांना दाखवणार ना? तर त्यांना माहिती आहे.
मी: त्यांना माहिती आहे आणि मला माहिती नाही.
अंतरा: आई चिल. अगं तू गावाला गेली होतीस तेंव्हा, म्हणून आजीला सांगितलं.
अंतरा अशा छोट्या छोट्या गोष्टी, बक्षिसं मिळवत असते पण मी कधी कोणाला आपणहून सांगायला जात नाही. हं अपवाद तेंव्हाच जेंव्हा ती १० छान कामं करेल. तेंव्हा एकाचं कौतुक जाहीर रित्या करायचं असा अलिखित नियम आहे आमच्याकडे. सकाळी अंतरा सुडोकू सोडवताना दिसली की मी तिला गेट सेट गो! म्हणते. डिस्टर्ब करत नाही. मला ती हसते आणि परत डोकं घालून कोडं सोडवायला घेते.
मी ही हळूच जाऊन benefits of sudoku: 11 reasons वाचून काढले. अंतराला मात्र indirectly सांगितलं.
मी: ती समोरची आर्या.. तिचा हल्ली चेहराच दिसत नाही म्हणत होत्या काकू.
अंतरा: का?
मी: डोकं खालीच असतं ना गं तिचं कायम.
(त वरून तकभात ओळखणारी आमची अंतरा म्हणाली)
अंतरा: आई.... मी दिवसातून दोनदाच खेळते सुडोकू.
मी: हो ना. मी पण माझ्या होमिओपॅथी डॉक्टरांना सांगितलं आहे. मला पण गोळ्यांचा दिवसातून दोन वेळचाच डोझ द्या. अगं उगाच व्यसन नको लागायला.
अंतरा: बघा ना बाबा, आता माझ्या सुडोकू खेळण्याचा, समोरच्या आर्याचा, आईच्या होमिओपॅथी गोळ्यांचा आणि व्यसनाचा काय संबंध?
मी: अं? मला काही म्हणालीस?
अंतरा: मी बाबांशी बोलते आहे.
मी: मग ठीक आहे. आणि सांग ना वर्ल्ड वाईड कितवा नंबर आहे तुझा म्हणालीस?, अशा संभाषणाबद्दलची एक पोस्ट तिने शेअर केली आहे.
दरम्यान सध्या राधिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर तिच्या चाहत्यांनी वॉव, खूप छान, मस्तच, अभिनंदन अशा कमेंट केल्या आहेत. तर एकाने आईसारखी हुशार आहे अंतरा असे म्हटले आहे.
ENG
(96 ov) 364 (113 ov) 471
|
VS |
IND
00(0 ov) 465(100.4 ov)
|
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.