अनिकेत विश्वासरावच्या पहिल्या बायकोने केलं दुसरे लग्न, फोटो व्हायरल, सोशल मीडियावर चाहत्यांनी केलं ट्रोल

मराठी अभिनेत्री स्नेहा चव्हाण दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात. सोशल मीडियावर फोटो व्हायरल. चाहत्यांनी केलं ट्रोल. 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 13, 2024, 07:52 PM IST
अनिकेत विश्वासरावच्या पहिल्या बायकोने केलं दुसरे लग्न, फोटो व्हायरल, सोशल मीडियावर चाहत्यांनी केलं ट्रोल title=

Sneha Chavan Marriage : दिवाळीनंतर कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या घरात लगीनघाईला सुरुवात झाली आहे. अशातच काही कलाकार येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतेच अभिनेत्री स्नेहा चव्हाणच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याआधी स्नेहा चव्हाण हिने अभिनेता अनिकेत विश्वासरावबरोबर लग्न केले होते. 

दरम्यान, स्नेहा चव्हाण हिने 10 नोव्हेंबरला मानससोबत दुसरे लग्न केलं आहे. अभिनेत्रीने अगची साध्या पद्धतीने लग्न केले असून लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि काही खास मित्रमंडळी उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहेत. तर तिचा नवरा मानसने लेव्हेंडर रंगाचा शेरवाणी परिधान केला होता. 

स्नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो

अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने तिच्या लग्नाचे फोटो तिच्या इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यावर काही चाहत्यांनी तिला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तसेच काही चाहत्यांनी तिला दुसऱ्या लग्नामुळे ट्रोल देखील केलं. तर काही चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर घाणेरड्या कमेंट केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ज्यामध्ये काही चाहत्यांनी म्हटलं आहे की, पुन्हा एकदा अभिनंदन, मॅडम आता हॅट्रिक तर झालीच पाहिजे असं देखील एका चाहत्याने तिच्या फोटोंवर कमेंट केली आहे. तर तिसऱ्या चाहत्याने हा कट्टपा कोण अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर सध्या तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहे. 

स्नेहाचे अनिकेतच्या आईवर गंभीर आरोप

अभिनेत्री स्नेहा चव्हाणचे पहिले लग्न हे अभिनेता अनिकेत विश्वासरावबरोबर झाले होते. त्यानंतर काही दिवसांमध्ये दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. ज्यामध्ये स्नेहाने अनिकेतच्या आई आणि कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले. ज्यामध्ये घरगुती हिंसाचार, पैशांची मागणी आणि अनिकेतच्या आईकडून मारहाण असे आरोप तिने केले आहेत. परंतु अभिनेत्री स्नेहाने केलेले सर्व आरोप हे अभिनेता अनिकेतने फेटाळून लावले आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x