'अप्सरा' अडकली विवाह बंधनात?

सोनालीने मंगळसूत्र उलटं घातल्यामुळे चर्चा  

Updated: Feb 17, 2020, 04:47 PM IST
'अप्सरा' अडकली विवाह बंधनात? title=

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 'बकुळा नामदेव घोटाळे', 'नटरंग', 'हिरकणी' या आणि अशा काही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनाली विवाह बंधनात अडकली आहे का? अशा चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहेत. सोनालीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

गुलाबी रंगाची साडी त्याला सुंदर दागिन्यांची जोड, नथ आणि सोनालीने घातलेलं उलटं मंगळसूत्र. हे मंगळसूत्र तिने उलटं का घातलं यावरून इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे. तर तिच्या या फोटो एका चाहतीने कमेंट केली. 'तुमचं मंगळसूत्र उलटं झालं आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

यावर सोनालीने दिलेलं उत्तर चाहत्यांना पेचात पाडणारं आहे. 'लग्न झाल्यानंतर काही दिवस मंगळसूत्र उलटं घालवं लागतं' त्यामुळे सोनालीचं नक्की लग्न झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनालीच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. 

शिवाय, सोनाली कुलकर्णी आता तिच्या जीवनातील एका महत्त्वाच्या वळणावर आल्याचं म्हटलं जात आहे. सोनालीच्या जीवनात आता म्हणे एका खास व्यक्तीची एंट्री झाली आहे. खुद्द सोनालीनेच त्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा केल्याचंही म्हटलं जात आहे. कुणाल बेनोडेकर असं त्याचं नाव आहे. 

सोनालीने सोशल मीडियावर एक साहसी व्हिडिओ शेअर करत त्यामध्ये कुणालला टॅग केलं आहे. साथीदारासोबत आता एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे, असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.

सोशल मीडियावर सोनालीचा हा व्हिडिओ पाहता तिच्या या 'साथीदारा'विषयीसुद्धा बरंच कुतूहल पाहायला मिळत आहे. तेव्हा आता, ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचण्याची प्रतिक्षा करायला लावण्यापेक्षा सोनालीच कधी याबाबतची माहिती देते हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.