Ved and Vaalvi Collection : मराठी सिनेमांचा बोलबाला, 'वेड'नंतर आता 'वाळवी'चा कोटींमध्ये गल्ला

Ved Box Office Collection : मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत. बॉक्स ऑफिसवर अभिनेता रितेश देशमुख याच्या 'वेड' सिनेमाच्या ( Ved ) कमाईचा आकडा वाढता दिसून येत आहे. 

Updated: Jan 17, 2023, 04:39 PM IST
Ved and Vaalvi Collection : मराठी सिनेमांचा बोलबाला, 'वेड'नंतर आता 'वाळवी'चा कोटींमध्ये गल्ला title=

Marathi Movie Box Office Collection : मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत. बॉक्स ऑफिसवर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याच्या 'वेड' सिनेमाच्या ( Ved ) कमाईचा आकडा वाढता दिसून येत आहे. आता शुक्रवारी रिलीज झालेला परेश मोकाशी याच्या 'वाळवी' (Vaalvi) ने प्रेक्षकांवर आपली जादू केली आहे.  आता 'वाळवी'ची (Vaalvi) सगळीकडे प्रचंड चर्चा आहे. ( Entertainment News in Marathi

मराठी सिनेमा सध्या नवनवे विषय हाताळत आहेत. त्यामुळे मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करताना दिसत आहेत. बॉलिवूडला आता मराठी इण्डस्ट्री जोरदार टक्कर दिसत आहे. मराठी सिनेमा पुन्हा एकदा भरारी घेताना दिसत आहेत. बॉलिवूड फिल्म एकापाठोपाठ एक आपटत असताना मराठी सिनेमा प्रेक्षकांना जणू मेजवानी ठरत आहे. गेल्या काही महिन्यात मराठी सिनेमा अतिशय वेगळया विषयावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता तेच चित्रपट बॉलिवूडला धोबीपछाड करताना दिसत आहेत.

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा सिनेमा हा कमाईत चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'वेड' ने प्रेक्षकांना वेड लावले आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असणारा 'वेड' या सिनेमाने गेल्या दोन आठवड्यात तब्बल 40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्यातही या सिनेमाने चांगला गल्ला जवला आहे. हा सिनेमा 50 कोटी रुपयांचा टप्पा गाठेल, अशी शक्यता आहे. आता 'वेड' च्या बरोबरीला नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'वाळवी' या सिनेमाने देखील प्रेक्षकांवर आपली जादू दाखवली आहे. परेश मोकाशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या 'वाळवी'ची सगळीकडे प्रचंड चर्चा आहे.

'वाळवी' या सिनेमात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे' यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यानी चांगला अभिनय साकारला आहे. सिनेमाच्या उत्तम कथेमुळे आणि मांडणीमुळे प्रेक्षकांच्या पसंतीला हा सिनेमा उतरत आहे. गेल्या चार दिवसात या चित्रपटाने 1 कोटी 40 लाखांची च चांगली कमाई केली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात हे दोन्ही सिनेमे सहज 2 कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या स्पर्धेत मराठी सिनेमा बॉलिवूडला टक्कर देणार याची चणूनक दिसून येत आहे.