'ज्या अवयवाच्या जोरावर माज आलाय तोच शरीरापासून वेगळा करा'

हैदराबाद बलात्कार प्रकरणावर सुबोध भावेचा संताप 

Updated: Dec 1, 2019, 07:45 AM IST
'ज्या अवयवाच्या जोरावर माज आलाय तोच शरीरापासून वेगळा करा' title=
'ज्या अवयवाच्या जोरावर माज आलाय तोच शरीरापासून वेगळा करा'

मुंबई : Hyderabad  हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टरवर झालेल्या सामुहिक बलात्कार Rape आणि हत्येप्रकरणीचा संताप साऱ्या देशातून व्यक्त केला जात आहे. सर्व स्तरांतून या प्रकरणीचा संताप व्यक्त केला जात आहे. कलाकारांनीही या मुद्द्यावर तीव्र शब्दांत त्यांचा संताप व्यक्त केला. ज्या अवयवाच्या जोरावर बलात्कार करणाऱ्या नराधमांना माज आला आहे, तो अवयवच शरीरापासून वेगळा केला पाहिजे असं ट्विट करत त्याने सर्वांचं लक्ष वेधलं. 

'ज्या छोट्याशा अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे', असं स्पष्ट मत देत जो देश स्त्रियांचा सन्मान ठेऊ शकत नाही तो स्वतःचं सत्व गमावतो हा विचार त्याने सर्वांपुढे ठेवला. #enoughisenough असा हॅशटॅग लिहित बलात्कार पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी करणाऱ्यांच्या सुरात सुबोध भावेने सुर मिसळला. 

सुबोधने हे ट्विट करताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी याप्रकरणी आपलाही संताप व्यक्त करत बलात्कारासारखं कृत्य करणाऱ्या नराधमांना देहदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असावी अशी मागणी केली, तर कोणी फक्त निर्भयाला न्याय द्या म्हणत आणि मेणबत्ती पेटवून या प्रकरणी निषेध नोंदवण्याला अर्थ काय असा प्रश्न उपस्थित करत आरोपींनाच जाळून टाका अशा तीव्र शब्दांत चीड व्यक्त केली. 

काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे  एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या खळबळजनक कृत्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेत अशी कृत्य करणाऱ्यांना तातडीने कठोर शिक्षा करण्याची तरतूद अशावी अशी मागणी प्रकर्षाने उपस्थित केली जात आहे. या प्रकरणी हैराबादच्या सायबराबाद स्टेशन पोलिसांनी चार आरोपींना पकडल्याचा दावा केला आहे. व्यक्त केली. 

दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याकांडला ७ वर्ष पूर्ण होत असतानाच ही जखम भरुन निघत नाही तोच काहीशी तशीच आणखी एक हादरवणारी घटना हैदराबादमध्ये घडली. ज्यामुळे पुन्हा एकदा देशात महिला सुरक्षित आहेत का असाही प्रश्न अधोरेखित होत आहे.