संगीतमय प्रेमकथा असलेल्या 'तत्ताड'चा ट्रेलर लॉन्च

'लपून जमवनं सोपं आस्तंय भावा...पन लपवून ठेवनं सोपं नस्तंय..' 

Updated: Feb 6, 2020, 06:59 PM IST
संगीतमय प्रेमकथा असलेल्या 'तत्ताड'चा ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : संगीतमय प्रेमकथा असलेल्या 'तत्ताड' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. 'तत्ताड' या नावातच असलेल्या वेगळेपणामुळे चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण झालं आहे. 

प्राइमफ्लिक्सने 'तत्ताड' चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर राहुल गौतम ओव्हाळ यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

'लपून जमवनं सोपं आस्तंय भावा...पन लपवून ठेवनं सोपं नस्तंय..' असं म्हणत, लग्नातल्या बँडमध्ये पिपाणी वाजवणाऱ्या एका तरुणाची प्रेमकहाणी या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या या गोष्टीला संगीताचा एक पदर आहे. 

चित्रपटात अनेक नव्या कलाकरांनी भूमिका साकारली आहे.  येत्या २१ फेब्रुवारीला 'तत्ताड' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.