लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार 'मस्त महाराष्ट्र' दर्शन

महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्रचं दर्शन

Updated: Jun 30, 2020, 01:29 PM IST
लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार 'मस्त महाराष्ट्र' दर्शन title=

मुंबई : शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कलाकारांच्या आयुष्यात निवांत क्षण खूप कमी येतात. त्यामुळे जेव्हा त्यांना सुट्टी मिळते तेव्हा ते भटकंती करण्याची संधी अजिबात सोडत नाहीत. पण जर काम आणि भटकंती एकत्र आलं तर? हि संधी मिळाली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला. ती लवकरच 'मस्त महाराष्ट्र' या अनोख्या सोलो ट्रॅव्हल शोमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्रचं दर्शन प्राजक्ता या शोमधून घडवणार आहे. विशेष म्हणजे प्राजक्ता या कार्यक्रमाची सुत्रसंचालक असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्राजक्ता संपूर्ण महाराष्ट्र फिरली आहे. या कार्यक्रमाचं काही चित्रीकरण लॉकडाउनच्या आधी करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम मराठीसह, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्येदेखील पाहायला मिळेल.

यानिमित्तानं महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीही प्रेक्षकांना जाणून घेता येईल. आतापर्यंत मुंबई, लोणावळा, पुणे, रत्नगिरी, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणी याचं चित्रीकरण झालं आहे. नुकतच या कार्यक्रमाचं टायटल एंथम प्रदर्शित झालं आहे. यात प्राजक्ताने या प्रवासादरम्यान काय काय धमाल केलीय हे पाहायला मिळतय. महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे वेगळेपण, तेथील वैशिष्ट्य याचं दर्शन या कार्यक्रमात पाहायला मिळेल.

हे एंथम पाहून प्राजक्ताचे चाहते हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहेत. येत्या ५ जुलै पासून झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. प्राजक्ता माळीसाठी हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय राहिला असेल यात शंका नाही.