मौनी रॉय बॉयफ्रेंडसोबत अडकणार विवाह बंधनात?

कोण आहे मौनीचा बॉयफ्रेंड?  

Updated: Jan 17, 2021, 06:14 PM IST
मौनी रॉय बॉयफ्रेंडसोबत अडकणार विवाह बंधनात?

मुंबई : 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉयने अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'गोल्ड' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'गोल्ड' चित्रपटानंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील वाढ झाली. त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहणारी मौनी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मौनी लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, मौनी लवकरच दुबई स्थित एका बॅकरसोबत लग्न करणार आहे. तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सूरज नांबियार असं आहे. दरम्यान देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मौनी तिच्या बहिणीकडे दुबईला गेली होती. 

त्याचवेळी त्यांची भेट झाली. मौनी आणि सुरज एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या वाऱ्यासारख्या रंगत आहेत. त्यामुळे आता हे दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. 

काही दिवसांपूर्वी मौनीने सुरजसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवाय तिने त्याच्यासोबतचं नातं देखील जाहीर केलं. महत्त्वाचं म्हणजे सध्या बॉलिवूडमधील अनेक जोडपे लग्न बंधनात अडकले आहेत. तर आता मौनी देखील विवाह बंधनात अडकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.