मयुरी देशमुखने जागवल्या डॉ. शीतल आमटे यांच्या आठवणी

डॉ. शीतम आमटेंनी केली आत्महत्या 

Updated: Dec 2, 2020, 04:49 PM IST
मयुरी देशमुखने जागवल्या डॉ. शीतल आमटे यांच्या आठवणी title=

मुंबई : बाबा आमटेंची नात आणि डॉ. विकास आमटेंची मुलगी डॉ. शीतल आमटे यांनी सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली. डॉ. शीतल आमटे यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अभिनेत्री मयुरी देशमुखने देखील आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. 

मयुरी देशमुखचा नवरा अभिनेता आशुतोष भाकरेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर मयुरी देशमुखला आधाराची गरज होती. त्याचवेळी डॉ. शीतल आमटे यांनी मयुरीला खूप धीर दिला होता. त्यावेळी डॉ. शीतल आमटेंनी साधलेला संवाद मयुरीला आठवत आहेत. 

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीनं अभिनेता आशुतोष भाकरेनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आशुतोष भाकरेनं नांदेड इथल्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आपल्याला माहितीच आहे अभिनेत्री मयुरी देशमुख ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून घराघरात पोहोचली. ती आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी सध्या खूप प्रसिद्धी झोतात आहे. मयुरीनं एक नाटक लिहिलं ते म्हणजे ‘डिअर आजो’. या नाटकानं खूप लोकप्रियता मिळवली. तसंच आता तिचं आणखी एक नाटक सुरू आहे. ते म्हणजे ‘तिसरे बादशहा हम है’. याशिवाय मयुरीनं ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटांमध्येही मयुरीनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.