राधिका आणि सौमित्रच्या नव्या आयुष्याला सुरूवात

पुन्हा लग्नबंधनात अडकणार राधिका सुभेदार 

Updated: Dec 19, 2019, 04:01 PM IST
राधिका आणि सौमित्रच्या नव्या आयुष्याला सुरूवात  title=

मुंबई : झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका नवं वळण घेत आहे. मालिकेत राधिका सुभेदार पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. राधिका लवकरच सौमित्रसोबत लग्न करणार आहे. राधिका आणि सौमित्रचा विवाहसोहळी झी मराठीवर विशेष भागात दाखवण्यात येणार आहे. 

मला नेहमी प्रश्न पडतो, ही इतकी साधी का? 
अशी आहे माझी बायको राधिका...

हा सुंदर उखाणा सौमित्रने राधिकासाठी लग्नात घेतला आहे. एवढंच नाही तर राधिकाने देखील सौमित्रसाठी खास उखाणा घेतला आहे. 

गणपतीच्या शिरावर आहे हिऱ्या मोत्याचं छत्र 
सौमित्रच्या नावाने घातलंय मी मंगळसूत्र 

गुरूनाथ सुभेदारची पत्नी ते राधिका मसाले उद्योगाची सर्व्हेसर्वा अशी ओळख राधिकाने निर्माण केली आहे. गुरूनाथचे विवाहबाह्य असलेले संबंध आणि पत्नी म्हणून मिळणारे दुय्यम स्थान या सगळ्यातून कंटाळून राधिकेला गुरूनाथला घटस्फोट दिला आहे. तिच्या या धाडसी निर्णयात तिचे सासू-सासरे अगदी आई-बाबांसारखे पाठीशी राहिले. 

याच काळात जुना मित्र सौमित्रशी जवळीक वाढते. सौमित्र राधिकावर मनापासून प्रेम करत असतो. पण ती भावना व्यक्त करण्यासाठी त्याला जेनी आणि आनंदची मदत घ्यावी लागते. अखेर आता राधिका-सौमित्र लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचा हा खास सोहळा झीचोवीसतासवर पाहता येणार आहे.