close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' अखेरीस प्रदर्शित करण्यात आला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे दिग्दर्शन असलेला सिनेमाच्या कथेवर वाद सुरू होता. 

Updated: Feb 11, 2019, 12:50 PM IST
'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' अखेरीस प्रदर्शित करण्यात आला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे दिग्दर्शन असलेला सिनेमाच्या कथेवर वाद सुरू होता. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. सिनेमा स्वच्छतेवर आधारलेला असुन ट्रेलर 2.30 मिनीटांचा आहे. सिनेमात एका 8 वर्षाच्या मुलाची कथा सादर केली. 8 वर्षांचा मुलगा कन्हैया त्याच्या आईसोबत मुंबईच्या एका झोपडीत राहत आसतो.पण त्यांच्या सुखी आयुष्याला नजर लागते, त्याची आई शौचालयासाठी उघड्यावर गेली असता तिच्यावर विनयभंगाचा प्रसंग ओढावतो. त्यानंतर कन्हैया शौचालय बणवण्यासाठी पंतप्रधानांना एक पत्र लिहत विचारतो, तुमच्या आई सोबत असे झाले असते तर तुम्हाला कसे वाटले असते?

 

ट्रेलरमध्ये सर्वात आधी दिल्ली येथील राजपथाचे दर्शन होत आहे. कन्हैया त्याच्या दोन मित्रांसोबत पंतप्रधानांना भेटण्यासाठी येतो. ट्रेलरचे टायटल गाणे गायक अरिजीत सिंगने स्वरबद्ध केले आहे. ट्रेलर मध्ये कन्हैया सांगत आहे, मागीतल्याने काही मिळत नाही केल्याने होत आहे, आणि ते फक्त एकच माणुस करु शकतो ते म्हणजे- गांधी जी

'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' सिनेमाची कल्पना राकेश ओमप्रकाश मेहरा यांना 'भाग मिल्खा भाग' सिनेमाच्या शूटिंग वेळेस आली. सिनेमाच्या शूटिंगचे शेवट झाल्यानंतर सकाळी 4 फिल्मसिटी जवळ असलेल्या झोपडीमध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणावर महिला शौचालयास गेल्या होत्या. तर 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' सिनेमा 8 मार्च 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे.