मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमन आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर कायम झगमगत्या जगापासून दूर राहात आनंदी जीवन जगत असतात. वयाचं अंतर पाहाता दोघांच्या लग्नानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पण दोघांनी जगाचा विचार न करता फक्त त्यांच्या नात्याचा विचार केला. 22 एप्रिल 2018साली त्यांनी लग्न केलं आणि प्रत्येकाला मोठा धक्का बसला. आता त्यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांना फॅमिली प्लानिंगबद्दल विचारलं जातं.
नुकताचं अंकिताने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. या सेसनमध्ये एका युजरने 'मोठ्या वयाच्या मुलासोबत लग्न करू नको? अशा स्टीरियोटाईप लोकांच्या प्रश्नाला तु कशा प्रकारे उत्तर देते. ' यावर अंकिता म्हणाली 'आपल्या समाजात ज्यांचे विचार योग्य पातळीपर्यंत पोहोचले नाहीत, तेचं असे प्रश्न विचारतात.'
पुढे अंकिता म्हणाली, 'अशा गोष्टी फक्त भारतातचं नाही, तर बाहेर दोखील अशा विचारांचे लोक असतात. अनोळख्या गोष्टींवर लोक विचित्र प्रतिक्रिया देतात. ज्या गोष्टींमधून मला आनंद मिळतो. त्याचं गोष्टी मी करतो.' त्यानंतर दुसऱ्या युजरने अंकिताला फॅमिली प्लानिंगबद्दल विचारलं.
'तुमच्या लग्नाला अनेक वर्ष झाली, तुम्हा फॅमिली प्लानिंगबद्दल काय विचार करता?' युजरच्या या प्रश्नावर अंकिता म्हणाली, 'आम्ही प्लन्ड फॅमिली आहोत, पुढे...' असं म्हणत तिने एक इमोजी सेन्ड केला आहे.