मुंबई : गेल्याच महिन्यात ५२ वर्षीय मॉडेल आणि अॅक्टर मिलिंद सोमणने २१ वर्षाने लहान असलेल्या गर्लफ्रेंड अंकिता कोनवारशी लग्न केले. मिलिंद आणि अंकिताने अलिबागमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. हे लग्न महाराष्ट्रीयन आणि आसामच्या परंपरेनुसार झाले. मिलिंद सोमण अंकितासोबत हनीमून साजरा करतोय. अंकिताने या हनीमूनचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. यात फोटोत ती बिकीनीमध्ये दिसतेय. मिलिंद आणि अंकिता आर्यलंडच्या हवाई येथे हनीमून साजरा करतायत. हनीमूनदरम्यान अंकिताचा बिकीनीमधील अंदाज दिसला. बिकीनी घालून अंकिता झाडावर पहुडलेली आहे. ते जरी हनीमून एन्जॉय करत असले तरी फिटनेसबाबत ते जागरुक आहेत.