लग्न झाल्यावर मिलिंद सोमणने अंकितासोबत केले हे काम

फोटोमध्ये लग्नानंतर दोघे एक काम करताना दिसत आहेत. हे काम पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Updated: Apr 25, 2018, 05:57 PM IST
लग्न झाल्यावर मिलिंद सोमणने अंकितासोबत केले हे काम title=

मुंबई: मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने गेल्याच आठवड्यात (२२ एप्रिल) गर्लफ्रेंड अंकिता कुंवर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. आपल्या वयापेक्षा तब्बल २५ वर्षांनी छोटी असलेल्या अंकितासोबतचे त्याचे विवाहप्रसंगीचे फोटोही जोरदार व्हायरल झाले आहेत. पण, या फोटोंसोबत मिलिंद आणि अंकिताचा आणखी काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्या फोटोमध्ये लग्नानंतर दोघे एक काम करताना दिसत आहेत. हे काम पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नवदाम्पत्याने हाती घेतले विशेष काम

मिलिंद सोमणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो आपली पत्नी अंकितासोबत वृक्षारोपण करताना दिसत आहे. या फोटोला मिलिंदने जी कॅप्शन दिली आहे, त्या कॅप्शनमधून त्याची निर्मळता डोकावते. तो म्हणतो की, लग्नात आलेल्या प्रत्येक पाहूण्याच्या नावाने आम्ही वृक्षारोपण करणार आहोत. आता पर्यंत आम्ही ११ रोपे लावली आहेत. लग्नानंतर नवी सुरूवात करणाऱ्या मिलिंदने एक नवा आदर्श आपल्या कृतीतून दिला आहे. दरम्यान, मिलिंद आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देतो. म्हणूनच या जोडप्याने हा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे.

 

Nurture the gifts you have received  planting a tree with @earthy_5 for every guest, 11 done! #everydayisEARTHday #celebratenewbeginings #everyday #BetterHabits4BetterLife at @bohemyanblue #love #life #earth #friends #family

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

अडचणी पार करून झाला विवाह

विशेष असे की, मिलिंद सोमणसाठी लग्नची गोष्ट विशेष अडचणीची नव्हती. पण, अंकितासाठी हा निर्णय काहीसा कठीण होता. कारण, अंकिताच्या घरातील लोक या लग्नासाठी विशेष तयार नव्हते. उलट ते काहीसे नाराजच होते. पण, हळू हळू चर्चेतून सूर जूळत गेले. सर्व काही सुरळीत पार पडले. पण, तोपर्यंत सोशल मीडियावर या जोडप्याला नेटीजन्सकडून चांगलेच ट्रोल करण्यात आले.  इतके की, दोघांचे ब्रेक-अप झाल्याच्याही बातम्या आल्या. पण, लवकरच ही माहिती केवळ अफवा असल्याचे पुढे आले.