मिलिंद सोमणने शेयर केलाय हनीमुनचा फोटो

मिलिंदनेही दोघांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केलाय.

Updated: May 19, 2018, 08:10 AM IST
मिलिंद सोमणने शेयर केलाय हनीमुनचा फोटो  title=

मुंबई :  गेल्याच महिन्यात ५२ वर्षीय मॉडेल आणि अॅक्टर मिलिंद सोमणने २१ वर्षाने लहान असलेल्या गर्लफ्रेंड अंकिता कोनवारशी लग्न केले. मिलिंद आणि अंकिताने अलिबागमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. हे लग्न महाराष्ट्रीयन आणि आसामच्या परंपरेनुसार झाले. मिलिंद सोमण अंकितासोबत हनीमून साजरा करतोय. अंकिताने या हनीमूनचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. यात फोटोत ती बिकीनीमध्ये दिसतेय. मिलिंद आणि अंकिता आर्यलंडच्या हवाई येथे हनीमून साजरा करतायत. हनीमूनदरम्यान अंकिताचा बिकीनीमधील अंदाज दिसला. बिकीनी घालून अंकिता झाडावर पहुडलेली आहे. ते जरी हनीमून एन्जॉय करत असले तरी फिटनेसबाबत ते जागरुक आहेत. त्यानंतर आता मिलिंदनेही दोघांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केलाय.

 

Beach bums ! Pic : reluctant tourist

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

कोण आहे अंकिता कंवर?

दिल्लीत राहणा-या अंकिताने एअर एशिया एअरलाईन्समध्ये केबिन क्रू म्हणून कामाला सुरूवात केली होती. हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, बंगाली अशा विविध भाषांवर प्रभूत्व असलेली अंकिता मॅरेथॉनदरम्यानच मिलींद सोमणच्या प्रेमात पडली. २०१५ मध्ये अंकिताने मिलींदसोबत मॅरेथॉनचा टप्पाही पूर्ण केला होता.

अफेअरमुळेही मिलिंद सोमण चर्चेत

खरंतर मिलींद सोमणचं हे दुसरं लग्न. याआधी जुलै २००६ मध्ये फ्रेंच अॅक्ट्रेस  मायलेनशी मिलिंदने लग्नाची गाठ बांधली होती. मात्र ती फार काळ काही टिकली नाही.  माजी मिस इंडिया आणि मॉडेल मधू सप्रेसोबतच्या अफेअरमुळेही मिलींद सोमण चर्चेत होता.