५५ व्या वाढदिवशी मिलिंद सोमणने शेअर केला न्यूड फोटो

समुद्र किनारी साजरा केला वाढदिवस 

Updated: Nov 4, 2020, 02:02 PM IST
५५ व्या वाढदिवशी मिलिंद सोमणने शेअर केला न्यूड फोटो  title=

मुंबई : मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण आज ५५ वर्षांचा झाला. आजच्या दिवशी मिलिंद सोमणने सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मिलिंद सोमणच्या फिटनेस रहस्य म्हणजे 'धावणं'. पण जेव्हा मिलिंद सोमण समुद्रावर न्यूड धावतो. ...

फिटनेसबद्दल मिलिंद सोमण कायमच सगळ्यांना प्रेरणा देत असतो. यावेळी त्याने एक पाऊल पुढे होऊन समुद्र किनारी धावणारा फोटो शेअर केला आहे. पण या फोटोत तो Naked Run करत आहेत. त्याचा हा फोटो त्याची पत्नी अंकिता कोनवरने क्लिक केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday to me ! . . . #55  @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

हॅप्पी बर्थ डे टू मी म्हणत #55 असं म्हणतं मिलिंद सोमणने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. तसेच फोटो क्रेडिट अंकिताला दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ankita Konwar (@ankita_earthy) on

अंकिताने पण सोशल मीडियावर पोस्ट टाकून मिलिंद सोमणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने मिलिंद सोमणसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. 'माझं हृदय आणि आत्मा असलेल्या माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाला मी तुझ्यावर प्रेम करते. तुझ्यासोबत मी प्रत्येक दिवस साजरा करत असते. १२ किमी समुद्र किनारी धावून अगदी टोमॅटो सारखा लालबूंद झालेल्या माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. '

गोव्यात मिलिंद आणि अंकिता आजचा दिवस साजरा करत आहे. मिलिंद कायमच आपलं वय अंकाने मागे टाकत पुढे जात असतो. तरूणाईला लाजवेल असं मिलिंद सोमणचं वर्क आऊट कायमच राहिलेलं आहे. आता यासोबत अंकिता देखील आपल्या शरीराची काळजी घेताना दिसते.