कोट्यवधींचे मालक Amitabh Bachchan कपडे रिपीट करतात?

कोट्यवधींचे मालक असूनही बिग बींना धुवावे लागतात स्वतःचे कपडे?   

Updated: Oct 7, 2022, 02:57 PM IST
कोट्यवधींचे मालक Amitabh Bachchan कपडे रिपीट करतात?

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले होते. 70 ते 90 च्या दशकापर्यंत इंडस्ट्रीवर राज्य करणारे बिग बी आजही अभिनयात तरुण अभिनेत्यांना मागे टाकतात. आज प्रत्येकाला माहित आहे बच्चन कुटुंबाकडे प्रचंड संपत्ती आहे. अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंब रॉयल आयुष्य जगतात. मात्र, लक्झरी लाईफस्टाईल, स्टारडमपासून दूर राहून स्वत:चे कपडे स्वत: धुवणारे बिग बी अत्यंत साधे आहेत. हे जाणून तुम्हाला देखील नक्कीच धक्का बसला असेल, पण ही गोष्ट अगदी खरी आहे. (amitabh bachchan life style)

ही गोष्ट खुद्द बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' (KBC) मध्ये सांगितली. सध्या अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'चा 14वा सीझन होस्ट करत आहेत. KBC 14 च्या मंचावर, बिग बी केवळ स्पर्धकांसोबत खेळ खेळत नाहीत तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करतात. (amitabh bachchan emotional in kbc)

केबीसीच्या शेवटच्या एपिसोडमध्ये, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट स्पर्धक पिंकी जवारानीला हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. हॉटसीटवर बसताच पिंकी जवारानी भावुक होतात आणि सांगतात की, त्या या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होत्या. 

दरम्यान, पिंकी सेलिब्रिटींच्या खासगी गोष्टीबद्दल एक मत व्यक्त करतात. त्या म्हणतात, 'सेलिब्रिटी स्वतःचे कपडे धुवत नाहीत, शिवाय सेलिब्रिटी कपडे रिपीट देखील करत नाहीत....' पण पिंकीची चर्चा फेटाळून अमिताभ बच्चन धक्कादायक खुलासा करतात. 

बिग बी स्वतःचे कपडे स्वतः धुवतात. एवढंच नाही बिग बी फक्त शुटिंग दरम्यानच फँसी कपडे घालतात (Amitabh Bachchan repeats clothes). ऐरवी ते साधे कपडे घालतात आणि रोजचे कपडे रिपीट देखील करतात. या गोष्टीचा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनी केला आहे.