विश्व सुंदरी ठरलेली हरनाझ संधू एकेकाळी बॉडी शेमिंगची शिकार

 भारतातील २१ वर्षाच्या हरनाझ  कौर संधूने मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावलाय. 

Updated: Dec 13, 2021, 05:13 PM IST
विश्व सुंदरी ठरलेली हरनाझ संधू एकेकाळी  बॉडी शेमिंगची शिकार title=

मुंबई : भारतातील २१ वर्षाच्या हरनाझ  कौर संधूने मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावलाय. याआधी २००० मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने आणि १९९४ मध्ये सुष्मिता सेनने देखील हा मान पटकावला होता. इजराईलच्या इवियट शहरमध्ये पार पडलेल्या LIVA मिस डीवा यूनिवर्स 2021 मध्ये हरनाझ संधूने 75 देशाच्या सुंदर महिलांवर मात करत हा पुस्कार आपल्या नावे केलाायं. 

सध्या सागळ्या जगाच्या नजरा हरनाझवर खिळल्या आहेत. प्रत्येकाला हरनाझबद्दल जाणून घ्यायचं आहे.  अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलेल्या हरनाझचं इन्स्टा अकाऊंट पाहून असं दिसतं आहे की, ती तिचं आयुष्य अगदी साधेपणाने जगते. जर तुम्ही तिचं 2018 किंवा त्याहून आधीचे फोटो पाहिल्यास, ती यंदाची मिस युनिव्हर्स आहे हे तुम्ही ओळखू शकणार नाही. हरनाझ लहानपणापासूनच खूप सुंदर आहे. शालेय जीवनात हरनाज खूप बारिक होती. आणि यामुळेच तिला बॉडी शेमिंगचाही समना करावा लागला होता. पण कालांतराने तिचं सौंदर्य आणि प्रतिभा सुधारत गेली आणि त्याचा परिणाम आज आपण सर्वांनीच पाहिला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हरनाजला पाळीव प्राण्यांची आवड आहे. तिला प्रवास आणि घोडेस्वारीदेखील खूप आवडते. मिस युनिव्हर्सचा किताब पटकावल्यानंतर हरनाजचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिची लोकप्रियता किती वाढत आहे याचा अंदाज त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सवरून तुम्ही लावू शकता. मिस युनिव्हर्स बनताच हरनाजचे फॉलोअर्स सोशल मीडियावर वाढत आहेत.