Mithun Chakraborty ची सून Madalsa Sharma कास्टिंग काउचची शिकार

अनुपमा सीरियल फेम अभिनेत्री काव्या कास्टिंग काऊचची शिकार, व्यक्त केल्या भावना म्हणाली, 'मी देखील...'

Updated: Oct 8, 2021, 07:39 AM IST
Mithun Chakraborty ची सून Madalsa Sharma कास्टिंग काउचची शिकार title=

मुंबई: टीव्ही सीरियल अनुपमामधून घराघरात पोहोचलेली काव्या निगेटिव्ह रोल करत आहे. या काव्याचे चाहतेही खूप आहेत. सौंदर्यवती काव्या अर्थातच मदालसा शर्मा ही मिथुन चक्रवर्ती यांची सून देखील आहे. सध्या मदालसा शर्मा ही अनुपमा सीरियलमध्ये काव्याची भूमिका करत आहे. मदालसा शर्माला देखील कास्टिक काउचचा सामना करावा लागला होता. यासंदर्भात तिने एका मुलाखती दरम्यान खुलासा केला. 

कास्टिंग काउच हे बॉलिवूडचे घृणास्पद सत्य आहे जे नाकारता येणार नाही. बऱ्याचदा मुली आपले करिअर घडवण्याच्या नादात कास्टिंग काउचच्या जाळ्यात अडकतात. बऱ्याच अभिनेत्रींनी कास्टिंग काउच बाबत यापूर्वी आपले अनुभव शेअर केले आहेत. आता अनुपमा सीरियलमध्ये दिसणाऱ्या एका अभिनेत्रीचे नावही या यादीत आलं आहे. 

अनुपमा सीरियलमध्ये काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदलसा शर्माचं नाव या यादीमध्ये जोडण्यात आलं आहे. मदलसा ही बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. मदलसा देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. याबाबत तिने स्वत: एका मुलाखती दरम्यान आपलं दु:ख व्यक्त केलं. इतकच नाही तर यापासून कसं दूर राहायचं याचा सल्लाही तिने दिला आहे. 

मदालसा शर्माने कास्टिंग काउचबाबत मोठा खुलासा केला. एका वेब पोर्टलशी बोलताना मदलसा शर्मा म्हणाली, आजच्या काळात मुलगाच नाही तर मुलगी असणे हे दोन्ही खूप धोकादायक आहेत. तुम्ही कॉर्पोरेट जगात गेलात तर तिथे पुरुषांनी वेढलेली एक मुलगी आहे. काही लोक तुमच्यामध्ये इंट्रेस्ट दाखवतात. तुमच्या हातात आहे. लोकांना जरी तुम्ही आवडत असलात तरीही तुम्ही वाईट लोकांपासून लांब राहाणं हे तुमच्याच हातात आहे. 

चांगलं आणि वाईट दोन्ही सोबत असतं पण तुमच्या मर्जीवर हे अवलंबून आहे तुम्ही कोणत्या बाजूने जाताय किंवा कोणाची साथ देत आहात. लोक तुमचे कान भरू शकतात तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करतील. मात्र तुमची मर्जी तुमची इच्छा बदलू शकत नाहीत. 'मी देखील अशी घटनांचा सामना मोठ्या धैर्यानं केला आहे. बऱ्याचदा मला मिटिंगमध्ये ऑकवर्ड वाटेल असे लोक वागायचे. मी अशा लोकांकडे सरळ दुर्लक्ष केलं. तिथून दुर्लक्ष करून निघून गेले.'

'मला तिथून उठून जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. कोणामध्ये एवढी हिंमत नाही. मी इथे अभिनेत्री म्हणून आले आहे. मी माझं काम करते आणि तिथून निघून जाते. मला माझं आयुष्य कशा पद्धतीनं डील करायचं हे मी ठरवलं पाहिजे. इतर कोणीही नाही. हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. कोणीही तुमच्या आयुष्यावर हक्क दाखवू शकत नाही'