मिथुन चक्रवर्तीच्या सूनेचा बोल्ड फोटो व्हायरल नेटकरी म्हणतायेत...

मदलसा दररोज तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Updated: Sep 6, 2021, 06:21 PM IST
मिथुन चक्रवर्तीच्या सूनेचा बोल्ड फोटो व्हायरल नेटकरी म्हणतायेत... title=

मुंबई : टीव्ही शो 'अनुपमा' लोकांचा आवडता शो आहे. हेच कारण आहे की लोकांना या शोची प्रत्येक पात्र खूप आवडतात. अनुपमा नंतर, जर लोकांना शोमधील कोणतंही पात्र आवडत असेल तर ते पात्र म्हणजे काव्या. काव्या अर्थात मदलसा शर्मा शोमध्ये बऱ्यापैकी स्टायलिश दाखवण्यात आली आहे. पण खऱ्या आयुष्यातही ती खूप फॅशनेबल आहे. मदलसा दररोज तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

मदलसाचा ग्लॅमरस लूक
मदलसा शर्माने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने एक सुंदर मोनोकिनी परिधान केली आहे. तिने ही मोनोकिनी श्रगसोबत कॅरी केली आहे. मदलशाने तिचा फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांच्या कमेंट्सचा पूर आला आहे. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. अभिनेत्रीची ही स्टाईल देखील बरीच शाही दिसतेय.

मदलसाची आई
मदलसा शर्मा अभिनेत्री शीला डेव्हिडची मुलगी आहे. शीला डेव्हिड आणि मदलसा यांचं बॉन्डिंग मैत्रिणीसारखं आहे. आई शीला डेव्हिडमुळे, मदलसा शर्माला लहानपणापासूनच तिच्या आईकडून बरंच काही शिकायला मिळालं. लुकच्या बाबतीत मदलसा शर्मा तिच्या आईसारखी दिसते. दोघांचे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की मदलसा ही तिच्या आईची कॉपी आहे. मदलसा शर्माची आई टीव्ही शो 'संजीवनी' मध्ये दिसली होती. या टीव्ही शोमध्ये सुरभी चंदना या मुख्य भूमिकेत ती दिसली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पतीने केलं प्रेरित
मदलसा शर्माचं लग्न बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्तीशी झालं आहे. 2018 मध्ये त्यांचे लग्न झालं. लग्नानंतर सासरे मिथुन चक्रवर्ती यांनी मदलसा शर्माला अभिनयासाठी प्रेरित केलं. तसंच, मदलसा शर्माचे कुटुंबीय 'अनुपमा' या मालिकेचा एकही भाग चुकवत नाहीत.