'एकदम कडक'; राज ठाकरेंची 'या' चित्रपटावर 'मनसे' प्रतिक्रिया

काही कारणास्तव हा चित्रपट पाहायचं राहून गेलं होतं, पण... 

Updated: Sep 24, 2020, 01:34 PM IST
'एकदम कडक'; राज ठाकरेंची 'या' चित्रपटावर 'मनसे' प्रतिक्रिया title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : राजकीय वर्तुळात आपला वेगळा ठसा उमटवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray राज ठाकरे यांची कलेप्रतीची ओढ सारे जाणतातच. व्यंगचित्रांमध्ये रमणारे राज ठाकरे यांची कलेप्रतीची हीच ओढ सध्या त्यांनी लिहिलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमधून पाहायला मिळत आहे. 

बऱ्याच दिवसांपासून पाहायचा राहिलेला एक मराठी चित्रपट पाहिल्यानंतर, त्यावर एक प्रेक्षक आणि अर्थातच मराठी रंगभूमीचे हितचिंतक म्हणून राज ठाकरे यांनी ही पोस्ट लिहिली आहे. कोरोनोत्तर काळात मराळी रंगभूमी पुन्हा बहरु दे, असं म्हणत राज ठाकरे यांनी सुबोध भावेची मुख्य भूमिका असणाऱ्या '....आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', या चित्रपटाला उत्स्फूर्त दाद दिली आहे. 

हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला असला तरीही आपण मात्र तो आजवर पाहिला नव्हता. काही कारणास्तव हा चित्रपट पाहायचं राहून गेलं, असं म्हणत बुधवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळं सारंकाही ठप्प झालेलं असताना राज ठाकरे यांनी त्यांचा विरंगुळा या चित्रपटाच्या रुपात शोधला. 

'अप्रतिम' असं एका शब्दांत सर्वसमावेशक वर्णन करत त्यांनी या चित्रपटाची प्रशंसा केली. सोबतच काशिनाथ घाणेकरांपासून ते अगदी प्रभाकर पणशीकरांपर्यंत प्रत्येक पात्राला कलाकारांनी अगदी प्रभावीपणे उभं केल्याचं म्हणत त्यांनी सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन, नंदिता धुरी, प्रसाद ओक आणि इतरही कलाकारांचा अभिनय, 'एकदम कडक...' असल्याचीच प्रतिक्रिया दिली.

#काशिनाथघाणेकर #मराठीनाटक #मराठीसिनेमा #भालजीपेंढारकर #वसंतकानेटकर #प्रभाकरपणशीकर #DrKashinathGhanekar ##BhaljiPendharkar #VasantKanetkar #PrabhakarPanshikar #MarathiCinema #MarathiNatak #MarathiFilmIndustry

Posted by Raj Thackeray on Wednesday, September 23, 2020

 

चित्रपटातील काळ हा खऱ्या अर्थानं मराठी रंगभूमीता सुवर्णकाळ होता, असं लिहित त्यांनी येत्या दिवसांमध्येही आव्हानं पेलणारी ही मराठी रंगभूमी अशीच बहरु दे अशी इच्छा व्यक्त केली. इकतंच नव्हे तर, नाट्यगृहांबाहेर पुन्हा एकदा 'हाऊसफुल्ल'चे फलक कायमस्वरुपी लागो अशी आशा व्यक्त करत त्यांनी हा कलेचा नजराणा आपलासा केला.