Baby Bump : प्रेग्नेंट करीना कपूर करतेय वर्क कमिटमेंट्स पूर्ण

करिश्माने शेअर केला खास व्हिडिओ

Updated: Oct 27, 2020, 05:47 PM IST
Baby Bump : प्रेग्नेंट करीना कपूर करतेय वर्क कमिटमेंट्स पूर्ण

मुंबई : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. जानेवारी २०२१ मध्ये करीना आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. या गर्भावस्थेत करीना आपल्या वर्क कमिटमेंट्स पूर्ण करताना दिसत आहे. करिश्माने करीनाचे शूटिंग करतानाचे फोटो शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

करिश्माने इंस्टाग्रामवर बुमरँग व्हिडिओ पोस्ट केला आहे. करीना आपला मेकअप करताना दिसत आहे. खुर्चीवर बसलेली प्राजक्ता आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Working with the sis always the best #sistersquad #behindthescenes

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

काही दिवसांपूर्वीच करिना-सैफने आपल्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला आहे. याच दिवशी करिनाने आपल्या आनंदी संसाराचं गुपित सांगितलं. एकमेकांना खूप दिवस डेट केल्यानंतर १६ ऑक्टोबर २०१२ रोजी करिना आणि सैफने लग्न केलं. या दोघांच्या मुलाची तैमूरची सोशल मीडियावर खूप चर्चा असते. करिना लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देत आहे. जानेवारी मध्ये करिनाची दुसरी डिलिव्हरी होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

२० डिसेंबर २०१६ रोजी करिनाने आपल्या पहिल्या बाळाला तैमूरला जन्म दिला. तैमूरच्या जन्मानंतर त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. आता करिना-सैफ आणि तैमूरचे चाहते चौथ्या सेलिब्रिटीची वाट पाहत आहेत.