3 Idiots मधील अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात

नवीन वर्षात बांधणार लग्नगाठ 

Updated: Dec 8, 2019, 12:29 PM IST
3 Idiots मधील अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात

मुंबई : 38 वर्षांची अभिनेत्री मोना सिंह आपल्या खासगी आयुष्याबद्दल खूप कमी बोलताना दिसते. पण आता मोना सिंह चर्चेत आली आहे ती तिच्या खासगी आयुष्याबद्दलच. मोना सिंह लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. मोना सिंह बँकर असलेल्या मुलाशी लवकरच लग्न करणार आहे. 

'केहने को हमसफर है' Kehne Ko Humsafar Hain या हिंदी वेब सीरिजमध्ये मोना सध्या काम करत आहे. या वेबसीरिजच्या निर्मात्यांना तिने काम लवकरच संपवण्याची विनंती केली आहे. जेणे करून तिला तिच्या आयुष्यातील मोठ्या दिवसाकरता वेळ देता येईल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happiness is ..when u make unexpected new friends @avigowariker u are a gem thank u for this one #postpackupshot

A post shared by Mona Singh (@monajsingh) on

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी देखील या गोष्टीसाठी आनंदाने होकार दिला आहे. 14 डिसेंबरच्या अगोदर मोना तिची सर्व शेड्युल पूर्ण करणार आहे. 25 दिवसांत तिने या वेब सीरिजमधील सगळे सीन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. 14 डिसेंबर हा तिचा सेटवरील शेवटचा दिवस असल्याच सांगण्यात येत आहे. 

'जस्सी जैसी कोई नहीं' Jassi Jaissi Koi Nahin या मालिकेतील जसमीत वालिया अक्का जस्सी हे पात्र मोना सिंह साकारत होती. या पात्रामुळे मोना सिंह जस्सी म्हणूनच लोकप्रिय आहे. 'लग्न ही एक व्यवस्था आहे ज्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी दररोज माझ्या आई-बाबांच एकमेकांवर असलेलं प्रेम अनुभवते. मला देखील लग्न करायचं आहे, पण या संदर्भात अद्याप मी काही ठरवले नाही. ही गोष्ट सहज घडावी मला लग्नाचं सरप्राईज आवडेल,' अशी भावना काही दिवसांपूर्वी मोनाने दिली होती. 

अद्याप मोना सिंहने ती कुणासोबत लग्न करतेय याची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाबाबत खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे. अभिनेत्री मोना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मोना इन्वेस्टनेंट बॅंकरशी लग्न करणार असून पुढच्या वर्षी हा विवाहसोहळा पार पडणार आहे. नवीन वर्षी मोना लग्नगाठ बांधणार असून,सोशल मीडियावर मोनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.