Aleins Danny Sheehan: एलियन्सबद्दल तुम्हा-आम्हाला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. एलियन्सच्या अस्तित्वावरून संशोधकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आजपर्यंत कोणीही एलियनचे अस्तित्व पुराव्यानिशी सिद्ध करुन शकलेले नाही. आता मात्र, एलिनच्या अस्तित्वाबाबत सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. एलियन अमेरिकेच्या संपर्कात असून एलियनच्या अस्तित्वाबाबतची माहिती जगापासून लपवून ठेवण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. पृथ्वीवर एलियन राहत असून समुद्रात 100 वेळा UFO चे लँडिग पाहण्यात आल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने हा दावा केला आहे.
डॅनी शीहान (Danny Sheehan) असे या व्यक्तीचे नाव आहे. डॅनी शीहान हा यूएफओ व्हिसलब्लोअर्सशी संबंधित आहे. यूएफओ व्हिसलब्लोअर्स च्या यूनाइटेड स्टेट्स कांग्रेस परिषदेत डॅनी शीहान सहभागी होणार आहेत. त्याआधीच डॅनी शीहान यांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. अमेरिकेत समुद्राच्या तळाशी एक गुप्त बेस कॅम्प तयार करण्यात आला आहे. अमेरिका सरकार या गुप्त बेस कॅम्पच्या मदतीने UFO तसेच एलियनच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. डेली स्टारने याबाबतचे वृत्त दिले आहे.
समुद्राच्या तळाशी एलियन राहत असल्याचा दावा डॅनी शीहान यांनी केला आहे. इतकचं नाही तर डॅनी शीहान यांनी याचे लोकशन देखील सांगितले आहे. न्यू पॅराडाइम इन्स्टिट्यूटच्या सादरीकरणात डॅनी शीहान यांनी एलियच्या वास्तवाबाबात अनेक स्फोटक खुलासे केले आहेत. यूएसएस निमित्झ बॅटल ग्रुपशी संलग्न पाणबुडीच्या माध्यमातून UFO तसेच एलियनच्या हालचालींचे निरिक्षण केले जात आहे. अमेरिकेतील साइट ग्वाडालुप (Isla Guadalupe, Baja) जवळ तसेच लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेस समुद्राच्या तळाशी एलियनचे वास्तव्य आहे. या ठिकाणी समुद्रात 100 पेक्षा अधिक वेळा UFO चे लँडिग झाले असल्याचा दावा डॅनी शीहान यांनी केला आहे. येथे अनेक प्रकारचे दुर्लभ जीव आढळून आले असून अशा प्रकारचे जीव पृथ्वीवर इतर कुठेच आढळून आलेले नाहीत. मात्र, एलियन बाबात कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
NZ
(50 ov) 300/8
|
VS |
IND
306/6(49 ov)
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.