मौनी रॉयचा लग्नात सर्वात बोल्ड अंदाज, पतीला KISS करत....

टीव्हीवरील प्रसिद्ध आणि सौंदर्यवती मौनी रॉय नुकतीच विवाह बंधनात अडकली.

Updated: Jan 28, 2022, 07:57 PM IST
 मौनी रॉयचा लग्नात सर्वात बोल्ड अंदाज, पतीला KISS करत.... title=

मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध आणि सौंदर्यवती मौनी रॉय नुकतीच विवाह बंधनात अडकली. तिने आपल्या विवाह सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 27 जानेवारी रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. लाँग टाइम बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत विवाह केला आहे. 

सूरज नांबियार सऊथ इंडियन तर मौनी रॉय बंगाली आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्यातील एक फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोमध्ये मौनी रॉयचा पुन्हा एकदा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. 

गाली ब्राइडल गेटअपमध्ये मौनी रॉय अप्सरा म्हणून सुंदर दिसत होती. आहे. लग्नाच्या मंडपातील मौनी आणि सूरजच्या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

वऱ्हाडींसमोरच मौनी रॉय आणि सूरज काही फोटोंमध्ये रोमान्स करताना दिसले. एका फोटोमध्ये मौनीला सूरज KISS करत असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. 

मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या यांचं लग्न खास लोकांच्या उपस्थितमध्ये पार पडलं होतं. ज्यामध्ये आमना शरीफ आणि मंदिरा बेदी मौनीच्या वतीने प्रत्येक विधीमध्ये आपली उपस्थिती नोंदवली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)