...अन् चित्रपटगृहाच्या छतावर पोहोचला 'सिंबा'

'चित्रपटासाठी आणि चाहत्यांसाठी काहीपण....'

Updated: Dec 30, 2018, 02:22 PM IST
...अन् चित्रपटगृहाच्या छतावर पोहोचला 'सिंबा' title=

मुंबई : 'चित्रपटासाठी आणि चाहत्यांसाठी काहीपण....', अशीच एकंदर धारणा असणारा अभिनेता रणवीर सिंग कधी काय करेल याचा काही नेम नसतो. कोणा सेलिब्रिटीच्या विवाहसोहळ्याला कल्ला करणं असो, रसत्यावरील गरजूंना मदत करणं असो किंवा मग अचानकच एखाद्या विवाहसोळ्यात पोहोचत थेट वधू-वरांना धक्का देणं असो. रणवीर सिंग नेहमीच त्याच्या अनोख्या आणि तितक्याच हव्याहव्याश्या अंदाजात प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतो. 

अतिशय कमी वेळात हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळेपण सिद्ध करणारा हा हरहुन्नरी अभिनेता काही दिवसांपूर्वीच 'संग्राम भालेराव' या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आला. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंबा' या चित्रपटात तो, ही व्यक्तीरेखा साकारत असून, त्याचं हे रुप चांगलंच गाजतंय. चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये असणारा उत्साह आणि कुतूहल पाहता खुद्द रणवीरही स्वत:ला या वातावरणापासून दूर ठेवू शकलेला नाही. 

एका चित्रपटगृहामध्ये 'सिंबा' प्रदर्शित झाल्यानंतर रणवीरने थेट चाहत्यांशी संवाद साधल्याचं पाहायला मिळालं. मुंबईच्या वांद्रे येथील गॅलेक्सी चित्रपगृहात रणवीर आणि रोहित शेट्टी पोहोचले. चित्रपट संपल्यानंतर ज्यावेळी प्रेक्षक बाहेर आले तेव्हा रणवीरचा प्रत्यक्षात पाहून चाहत्यांना या साऱ्यावर विश्वास ठेवणंही कठीण झालं होतं. आपल्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या चाहत्यांना पाहून रणवीरनेही त्यांना आपल्याच अंदाजात आणखी एक सरप्राईज दिलं. 

 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

एका शिडीच्या मदतीने तो थेट त्या चित्रपटगृहाच्या छतावरच पोहोचला आणि तेथेच त्याने नृत्य करत चाहत्यांशी थेट संवादही साधला. रणवीर समोर असल्यामुळे चाहत्यांचा आनंदही पाहण्याजोगा होता. सोशल मीडियावर 'संग्राम भालेराव'रुपी रणवीर अर्थात 'सिंबा'चा व्हिडिओ कमालीटा व्हायरल होत आहे.