सारा अली खान प्रेमात? 'या' व्यक्तीसोबत पोस्ट शेअर करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमी  कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Updated: Jan 2, 2023, 09:10 PM IST
सारा अली खान प्रेमात? 'या' व्यक्तीसोबत पोस्ट शेअर करत म्हणाली... title=

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच सारा अली खानने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमी  कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती तिच्या पर्सनल लाईफसोबतच तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेही चर्चेत असते. साराने आत्तापर्यंतच्या सगळ्यात बड्या अभिनेत्यांसोबत झळकली आहे. मात्र यावेळी तिचं नाव एका मिस्ट्रीबॉयमुळे चर्चेत आहे. नुकतीच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एका मिस्ट्री बॉयसोबत दिसत आहे. 

सारा तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी लंडनमध्ये पोहचली अशी चर्चा सुरु होती. मात्र नुकतेच शेअर केलेले फोटो पाहून चाहते मात्र हैराण झाले आहेत. हे फोटो पाहून चाहते मात्र विचार करत आहेत की, तिच्यासोबत दिसणारा मिस्ट्रीबॉय नेमका आहे तरी कोण?
 
सारासोबत दिसणारा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण?
साराने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यातले पहिले फोटो काही खास नाहियेत. मात्र या पोस्टमधील चौथा फोटो पाहून मात्र चाहते हैराण होत आहेत. या फोटोवर येऊन प्रत्येकजणांची नजर याच फोटोवर खिळली. ज्यामध्ये ती एका मुलासोबत स्टाईलिश पोज देताना दिसत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिने रेड टॉपसोबत सिल्व्हर जॅकेट आणि ब्लॅक पँन्ट परिधान केली आहे. मात्र या फोटोत प्रत्येकाची नजर त्या मिस्ट्री मॅनवर जात आहे. ज्याने सारासोबत पोज दिली आहे. या फोटोत त्याने आपल्या हुडीने स्वत:चा चेहरा लपवला आहे. मात्र आता हा फोटो पाहून चाहते जाणून घेऊ ईच्छितात हा मिस्ट्री मॅन नेमका आहे तरी कोण?

'लव्ह आज कल 2' वेळी कार्तिक आणि साराच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र काही दिवसांतच या दोघांच्या ब्रेकअपच्याही बातम्या समोर आल्या. यानंतर या दोघांचंही नाव चर्चेत आलंय. मात्र यावेळी दोघांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. असं म्हटलं जातंय की, कार्तिक आणि सारा सध्या दोघंही वेकेशनवर गेले आहेत. याआधी सारा क्रिकेटर शुभमन गिलसोबत डेटिंगमुळे चर्चेत आली होती.