Baby John : बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार आहेत. पण एक असा कलाकार आहे ज्याला 'बेबी फेस'च्या चेहऱ्यामुळे लोकांना तो खूप आवडतो. या अभिनेत्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यासोबतच त्याचे करिअर देखील मजबूत आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे हा अभिनेता?
आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव वरूण धनव आहे. यावेळी वरूण धवन पडद्यावर रोमान्स किंवा कॉमेडी नाही तर ॲक्शन करताना दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 25 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्यासोबत वामिका गब्बी आणि कीर्ति सुरेशही दिसणार आहे.
वरुण धवनचे करिअर
'बेबी जॉन' चित्रपटाच्या आधी आम्ही तुम्हाला वरूण धवनच्या करिअर आणि बॉक्स ऑफिस रिपोर्टची ओळख करून देणार आहोत. वरूण धवनने 14 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट तर काही सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये काही फ्लॉप ठरले तरी दोन चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित झाले. 2012 मध्ये वरुण धवनने करण जोहरच्या स्टूडेंट ऑफ द ईयरमधून करिअरला सुरुवात केली होती. याच चित्रपटातून आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी डेब्यू केला होता. हा चित्रपट हिट ठरला होता.
त्यानंतर वरुण धवनने 'मैं तेरा हिरो' हा चित्रपट केला. या चित्रपटाचे बजेट 35 कोटी होते. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 78 कोटींची कमाई केली होती. तर भारतात 50.8 कोटी रुपयांची कमाई केली होती.
वरुण धवनचे सुपरहिट चित्रपट
वरुण धवनने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया', 'ABCD 2', 'बदलापूर', 'दिलवाले', 'डिशुम', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'जुडवा 2', 'अक्टूबर', 'सुई धागा', 'कलंक', 'स्ट्रीट डांसर 3 डी', 'कुली नंबर 1', 'जुग जुग जियो', 'भेडिया' आणि 'बवाल'. तर 25 डिसेंबर रोजी वरूण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनेक दिवसांपासून चाहते त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.