एका घटस्फोटानं समंथाला इतकं बदललं; करु लागली 'हे' काम

पाहा तिनं असं काय केलं.... 

Updated: Mar 20, 2022, 03:29 PM IST
एका घटस्फोटानं समंथाला इतकं बदललं; करु लागली 'हे' काम
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) हिनं तिच्या अभिनयानं मोठा चाहतावर्ग निर्माण केला. एक अभिनेत्री म्हणून नावारुपास येत असतानाच समंथानं अभिनेता नागा चैतन्यशी लग्नगाठही बांधली. 

एका प्रतिष्ठीत कुटुंबाची सून म्हणूनही तिच्याकडे पाहिलं गेलं. पण, पुढे नात्यांची समीकरणं बदलली आणि समंथाच्या वैवाहिक नात्यात वादळ आलं. 

घटस्फोटाला सामोरं गेल्यानंतर ही अभिनेत्री स्वत:साठी वेळ काढताना दिसली. झालेल्या मानसिक आघातातून सावरत असतानाच तिनं कलेची साथ सोडली नाही. 

'द फॅमिली मॅन 2'मध्ये दमदार अभिनय करणारी समंथा आता म्हणे तिच्या कारकिर्दीतील आव्हानात्मक भूमिकांसाठी तयार झाली आहे. नात्यांमध्ये आलेल्या वादळानंतर समंथामध्ये झालेला हा बदल पाहून प्रेक्षकांना तिचा हेवा वाटत आहे. 

आगामी 'यशोदा' या चित्रपटासाठी ती काही साहसदृश्य करताना दिसणार आहे. हॉलिवूडमधील स्टंटमॅन यानिक बेन यांच्यासोबत काम करणार आहे. खुद्द समंथानंच एक फोटो शेअर करत यासंबंधीची माहिती दिली. 

समंथाचा 'यशोदा' हा चित्रपट विज्ञान आणि काल्पनिक कथानकावर आधारित असेल. तामिळ, तेलुगू, कन्नडसोबतच ती हिंदी चित्रपटांतूनही झळकणार आहे. 

मानधनाचा आकडा वाढवला... 
दरम्यान, या चित्रपटासाठी समंथा आधी 2 कोटी रुपये इतकं मानधन घेणार होती. पण, मधल्या काळात तिच्या वाट्याला आलेलं यश पाहता या अभिनेत्रीनं मानधनाचा आकडा वाढवल्याचं म्हटलं गेलं. आता ती या चित्रपटासाठी तब्बल 3 कोटी रुपये इतकं मानधन घेणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x